सामाजिक कार्यकर्ते सुनिल भाऊ बनसोडे यांच्या वतीने हिन्दू स्मशानभूमीत व गावात सिमेंट बेंच भेट; घरगुती गणेशोत्सव व जेष्ठा गौराईची मान्यवरांच्या हस्ते आरती
काटी,दि.२४:उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटीचे सुपुत्र तथा पुणे येथे वास्तव्यास असलेले सामाजिक कार्यकर्ते सुनिल (भाऊ )बनसोडे यांच्या वाढदिवसानिमित्त येथील हिंदू स्मशानभूमीत स्वखर्चाने अंत्यसंस्कार करण्यासाठी आलेल्या नागरिकांना बसण्यासाठी 8 सिमेंट बँच (बाकडा)भेट दिले व गावातील रुकडोबा गल्लीतील दोन सिमेंट बेंच भेट देण्यात आले. शनिवार दि.23 रोजी सकाळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत भेट देण्यात आलेल्या 10 सिमेंट बेंच (बाकडा)चे लोकार्पण सोहळा संपन्न झाला. तत्पूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे यांनी घरगुती बसवलेल्या गणेश मुर्ती व जेष्ठा गौराईची आरती व पूजन विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते सुनिल (भाऊ) बनसोडे यांनी अशा प्रकारचा सामाजिक उपक्रम हाती घेतल्याबद्दल ग्रामस्थांनी समाधान मानले.
गणेश व गौरी लक्ष्मी समोरील आकर्षक देखावा व खाद्य पदार्थ सर्वांचे आकर्षण
गणेशोत्सवात माहेरवाशिणी सारखे जेष्ठा गौरीचे स्वागत केले जाते. त्याप्रमाणे सुनिल (भाऊ) बनसोडे यांच्या घरगुती गणेश व पावर्तीचे रुप समजल्या जाणाऱ्या जेष्ठा गौराईला नवीन वस्त्र, गौरीचा देखना मुकुट,बांगड्या, माळा,ठुसी,पुतळ्या,राणीहार, बाजुबंद,असे विविध दागदागिने घालून सजविण्यात आले होते. गणेश उत्सव व गौराई सण हा आनंदाचा आणि उत्साहाचा मानला जातो. या दहा दिवसांच्या उत्सवात गणपती बाप्पाला आवडणाऱ्या पदार्थांचा नैवद्य घरोघरी आनंदाने बनवला जातो. सामाजिक कार्यकर्ते सुनिल बनसोडे यांच्या घरगुती गणेशोत्सव व गौरी लक्ष्मी समोर मोदप्रिय गणेशासाठी आकर्षक मोदकांसह गौरी पूजनावेळी वेगवेगळ्या पद्धतीच्या खाद्यपदार्थांमध्ये विविध भाज्या फळे,करंज्या,लाडू,पुऱ्या, सांजोऱ्या, बर्फी आदी नैवेद्यामधील खाद्य पदार्थ सर्वांचे आकर्षण ठरले.
यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख, सामाजिक कार्यकर्ते सुनिल (भाऊ) बनसोडे, माजी सरपंच आदेश कोळी, उपसरपंच जुबेर शेख,अनिल गुंड, उद्योजक नेताजी चिवरे, करीम बेग, मकरंद देशमुख, बाळासाहेब भाले, ग्रामपंचायत सदस्य अनिल बनसोडे, हेरार काझी, सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन भागवत गुंड, चेअरमन संजय साळुंके,व्हाईस चेअरमन धनाजी ढगे, दशरथ बनसोडे, अमोल देशमुख, अमर देशमुख, रणजित देशमुख, धनाजी देशमुख, माजी सैनिक श्रीकांत गाटे,गोकुळ सोनवणे,बाळासाहेब शिंदे,संपत पंखे,अहमद पठाण, प्रविण देशमुख,हणमंत देशमुख, हणमंत ढगे, मंजूर कुरेशी,नागेश जाधव,नागेश बनसोडे,शाहू बनसोडे,सुरज बनसोडे,प्रशांत चव्हाण,बापू वाडकर,अनिल बरबडे,ग्रामपंचायत कर्मचारी अनिल बनसोडे, प्रशांत सुरवसे, दत्ता छबिले आदी मान्यवर उपस्थित होते.