डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार मी माझ्या जीवनात अंगीकारल्यानेच माझी प्रगती  - समीर जाधव

वागदरी, दि.२८ : एस.के.गायकवाड

मी लहान असतानाच माझ्या आई वडीलांनी आम्हा भावंडावर फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारांची  सतत विचार मंथन करून आम्हाला योग्य दिशेने वाटचाल करण्याची आणि चांगले विचार आत्मसात करण्याचे बाळकडू पाजले. त्यामुळे आमच्यावर चांगले संस्कार झाले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरानी आम्हाला संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिल्याने आम्ही आमच्या जीवनात यशस्वी झालो असे प्रतिपादन समीर जाधव  यांनी निरोप संभारंभ कार्यक्रमा प्रसंगी व्यक्त केले.


तुळजापूर तालुक्यातील जळकोट भिमनगर येथील जि.प. प्राथमिक शाळेत कार्यरत असलेल्या सौ.ज्योती माने  यांची बदली प्राथामिक शाळा वरुडा ता धाराशिव येथे झाल्याने त्यांचा  शालेय समीती आणि शिक्षणप्रेमी नागरीकांच्या वतीने  सत्काराचा कार्यक्रम घेण्यात  आले. .यावेळी समीर जाधव हे बोलत होते.
  

कार्यक्रमांच्या सुरुवातीस डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे पुजन  अरुण लोखंडे ,सहशिक्षक समीर जाधव यांच्या मातोश्री व ज्योती माने  यांच्या हस्ते  करण्यात आले . त्यानंतर सौ ज्योती माने व श्री समीर जाधव या दांपत्याचा आणि समीर जाधव यांच्या मातोश्रीचा पूर्णकपड्याचा भरती आहेर देवून व शाल फेटा देवून शालेय समीतीचे अध्यक्ष सोनल भालेराव उपाध्यक्ष साधना लोखंडे, कांचन लोखंडे, अरुण लोखंडे यांच्या हस्ते करण्यात आला .  


याप्रंसगी ज्योती माने  हे आपले विचार व्यक्त करताना अंत्यंत भावूक झाल्या होत्या. त्यांना त्यांचे अश्रू अनावर झाले होते. पाच वर्ष सतत मॅडमच्या सानिध्यात असलेले विध्यार्थी  ध्याय मोकलून रडत होते . उपस्थित सर्व पालक नागरीक हे काहीवेळा करिता भावनिक झाले. सर्वाचे डोळे पाणवले होते. शेवटी ज्योती मॅडम यांना निरोप देताना त्यांच्या गाडीपर्यत गुलाब पुष्पाची उधळण करून त्यांना अगदी जड अंतकरणाने निरोप देवून त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या.
 
 या प्रसंगी सहशिक्षिका ज्योती माने यांच्या वतीने उपस्थित मान्यवरांच्या हस्ते इ.१ ली ते ४ थी च्या सर्व विद्यार्थ्यांना जेवणाचे टीपण डबे व शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.
   
यावेळी दामू लोखंडे, सुरेश लोखंडे, गौतम लोखंडे, जीवन गुळे, सौ सुमन लोखरे, सौ भारत लोखंडे, सारीका भालेराव, श्यामल लोखंडे ,अंगणवाडी ताई कोमल माने, बबीता लोखंडे, सौ कांबळे आदीसह भिमनगर मधील माता पालक विद्यार्थी या कार्यकमास उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक सातिश माने  तर सुत्रसंचलन, आभार  मुख्यध्यापक बालाजी माळी यानी मानले.
 
Top