वागदरी,दि. २८:
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वागदरी ता.तुळजापूर येथील इ्यत्ता दुसरीत शिकत असलेली विद्यार्थीनी कु. संस्कृती तानाजी लोहार यांनी गणित जिनियस आँलंपियाड परिक्षेत घवघवीत यश संपादन करून धाराशिव जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. या यशाबद्दल तिचे सर्वञ आभिनंदन करुन कौतुक होत आहे.
गेल्या महिन्यात जिल्हा स्तरावर घेण्यात आलेल्या गणित जिनियस आँलंपियाड या परीक्षेत कु.संस्कृती लोहार यांनी भाग घेतला होता. सदर परिक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत तिने धाराशिव जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे.
तिने मिळविलेल्या या घवघवीत यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शालेय व्यवस्थापन समिती, व ग्रामस्थानी तिचे आभिनंदन केले आहे. कु.संस्कृती लोहार ही या शाळेतील सहशिक्षक तानाजी लोहार यांची ती कन्या असून या शाळेतील सहशिक्षिका आरती साखरे यांचे तिला विशेष मार्गदर्शन लाभले आहे.