मराठा आरक्षणाचा एल्गार, होळी येथे साखळी उपोषण सुरू

लोहारा ,दि.२७

मराठा योद्धा मनोज जंरागे पाटील यांच्या प्राणांतिक आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी होळी ता. लोहारा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. जो पर्यंत मराठा समाजाला न्यायालयीन प्रक्रियेमध्ये टिकणारं आरक्षण लागू करण्यात येत नाही तो पर्यंत हे साखळी उपोषण करण्यात येणार आहे. 


या काळात आजी, माजी आमदार, खासदार व सर्वपक्षीय राजकीय पक्षाच्या नेत्यांना गाव प्रवेश बंदी तसेच मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आज दि. २७ पासुन सकाळी ०९ वाजता या उपोषणाला सुरुवात करण्यात आली. 


आजचे उपोषणार्थी म्हणून महिलांनी पुढाकार घेतला. यावेळी सरोजा बिराजदार, सुनंदा मोरे, देवयानी गायकवाड, आयोद्ध्या बाबळसुरे, आशा जाधव, शशिकला गायकवाड, सुनंदा जाधव, रेखा बाबळसुरे, कमलाबाई जाधव यांच्यासह गावातील प्रा. गोविंद जाधव, प्रदीप मोरे, करण बाबळसुरे, संजय मनाळे, अजित जाधव, केशव सरवदे, सतीश माळी शंकर मोरे युवराज कोकाटे, ओम बिराजदार अभिषेक जाधव, विठ्ठल गायकवाड, विशाल जाधव यांच्यासह शेकडो समाजबांधव उपस्थित होते.
 
Top