ब्राह्मण समाजाच्या प्रमुख मागण्यासाठी नळदुर्ग मध्ये एक दिवशीय लाक्षणीक उपोषण

नळदुर्ग ,दि.२४

ब्राह्मण समाजाच्या विविध मागण्यासाठी येत्या 30 नोव्हेंबर रोजी  नळदुर्ग शहर सर्व शाखीय ब्राह्मण समाजाच्या वतीने नगरपरिषद कार्यालया समोर एक दिवशीय  लाक्षणीक उपोषण करण्यात येणार आहे.

दि.28 नोव्हेंबर पासून जालना येथील ब्राह्मण समाजाचे नेते दिपक भाऊ रणनवरे हे आमरण उपोषणास बसत आहेत. त्यास पाठींबा म्हणून नळदुर्ग शहरात सर्व शाखीय ब्राह्मण समाज संघटनेच्या वतीने येत्या दि.30 नोव्हेंबर  गुरुवार रोजी नळदुर्ग नगरपरिषदेच्या समोर सकाळी 10 ते 5 या कालावधीत साखळी उपोषण करण्यात  येणार असल्याची माहिती नळदुर्ग शहर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष  विनायक अहंकारी यांनी दिली आहे.

परशुराम आर्थिक विकास महामंडळाची लवकरात लवकर निर्मिती करण्यात यावे या मुख्य मागणीसह ब्राह्मण समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लावावेत अशी मागणी केली  आहे.
या निवेदनावर ब्राह्मण समाजाचे अध्यक्ष विनायक अहंकारी,सचिव मुकुंद नाईक,विकास कुलकर्णी, भाजपाचे युवा नेते सुशांत भूमकर,युवा नेते उमेश नाईक,मनसेचे शहर सचिव प्रमोद कुलकर्णी, सुहास पुराणिक,अजित भूमकर,अजय देशपांडे,संदीप वैद्य,शिरीष कुलकर्णी, चेतन दुबे, सुदर्शन पुराणिक , विशाल कुलकर्णी यांच्या सह्या आहेत. या उपोषणाचे निवेदन  नळदुर्ग नगरपरिषदेचे मुख्याधिकारी  लक्ष्मण कुंभार , सहाय्यक  पोलीस निरीक्षक  स्वप्नील लोखंडे यांना  देण्यात आले.
 
Top