भाजपा जिल्ह्यात नंबरवन राहणार - चालुक्य पाटील
जिल्हा कार्यकारिणी बैठकीस प्रतिसाद
नूतन पदाधिकाऱ्यांचा पत्र देवून सन्मान;
मराठवाडा संघटनमंत्री कौडगे यांची उपस्थिती


धाराशिव,दि.२५
आगामी सर्व निवडणुकीत ताकदीने काम करून पक्षाला नंबरवन ठेवण्यासाठी कटीबध्द असल्याचेही सांंगुन
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्ह्यात नंबरवन पक्ष राहणार असल्याचे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष संताजीराजे चालुक्य -पाटील यांनी केले. 

धाराशिव येथे शुक्रवारी (दि.२४) भाजपाच्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपाचे मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे तर प्रमुख उपस्थिती माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांची उपस्थिती होती.

बैठकीस हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने प्रारंभ करण्यात आला. बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र देवून मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. जिल्हाध्यक्ष चालुक्य यांनी मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले, पक्षाने जिल्हाध्यक्ष पदाची अत्यंत म्हत्वपूर्ण जबाबदारी दिली आहे. नूतन जिल्हा कार्यकारिणी घोषीत केली आहे. विविध विभागांच्या आघाड्या लवकरच जाहीर करणार आहोत. जुन्या, नव्या अशा सर्वांना जबाबदारी देवून सामावून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. प्रत्येकाला जबाबदारी देण्याचा प्रयत्न करणार आहे. 

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृृत्वाखाली भाजपा देशात तर प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे, उपमुख्यमंत्री श्री फडणवीस  यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रात भाजपा यशस्वी घौडदौड करीत आहे. देशात व राज्यात भाजपा नंबरवन पक्ष आहे. धाराशिव जिल्ह्यात देखील आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, नगर परिषदांसह सर्व निवडणुकीत पक्षाला घवघवीत यश मिळवून देवून पक्ष नंबरवन राहण्यासाठी जिवाचे रान करून मेहनत घेणार आहोत. पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी बुथ मजबूत करण्यासाठी मेहनत घ्यावयाची आहे. 

केंद्र व राज्या सरकारच्या लोककल्याणकारी योजना तळागाळापर्यंत, गोरगरिब, वंचितापर्यंत पोहंचवण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मेहतन घ्यावयाची आहे. लोककल्याणकारी योजनांमुळे पक्षाच्या आगामी सर्व निवडणुकीत घवघवीत यश मिळणार आहे. तत्पूर्वी श्री चालुक्य यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


यावेळी मंचावर प्रदेश सदस्य नेताजी पाटील, विनोद गपाट, नितीन काळे, ॲड. खंडेराव चौरे, सतीश देशमुख, प्रविण पाठक, अस्मिता कांबळे, गुलचंद व्यवहारे, रामदास कोळगे, बाळासाहेब क्षीरसागर, इंद्रजीत देवकते, प्रदीप शिंदे,  विलास राठोड, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष नंदाताई पुनगुडे, उपाध्यक्षा डॉ. सरोजनी राऊत, चिटणीस वनीता कटाळे, राणी राठोड आदींची उपस्थिती होती.

विश्वकर्मा योजना प्रभावी राबवा - आमदार राणाजगजितसिंह पाटील

नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षासाठी अधिक बळ देणे गरजेचे आहे. केंद्र व राज्याच्या शेकडो योजनांचा लाभ जनतेला मिळवून देणे गरजेचे आहे. विश्वकर्मा योजना जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे राबवून लाभार्थ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे आवाहन आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे.

पक्षात प्रचंड काम -ठाकूर

भाजपामध्ये पद घेणे इतके सोपे नाही. पक्षाचे प्रचंड कार्यक्रम, उपक्रम अखंड सुरू असतात. त्यामुळे पद घेतलेल्यांची जबाबदारी प्रचंड वाढली आहे. पक्षात प्रचंड काम करावे लागेल असे आवाहन भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी केले.

पक्ष बळकट करा - कौडगे

नवीन पदाधिकाऱ्यांनी अधिक जोमाने काम करणे गरजेचे आहे. पक्ष अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी अधिक परिश्रम घ्यावेत. पक्षाचे सर्व कार्यक्रम अधिक प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे. भारत विकास यात्रा, नव मतदार नोंदणी, विश्वकर्मा योजना, संविधान गौरव यात्रा, विविध आघाड्यांच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती, मन की बात कार्यक्रम, मंडल प्रभारी नियुक्ती, कोअर ग्रुप नियुक्ती असे सर्व कार्यक्रम नूतन पदाधिकाऱ्यांनी तातडीने राबवावेत असे आवाहन मराठवाडा संघटनमंत्री संजय कौडगे यांनी केले. बैठकीचे सूत्रसंचालन पक्षाचे जिल्हा सरचिटणीस विकास कुलकर्णी यांनी केले.

 
Top