नळदुर्ग शहरात विविध कार्यालयाकरित जागेचे प्रयोजन करण्याची जिल्हाधिकारी यांच्याकडे भाजपची मागणी

नळदुर्ग, दि.१२ 

शहरातील सर्वे नंबर २३६/२व २३६/३ मध्ये असलेल्या शासकीय जागेत नवीन कृषी कार्यालय, बसस्थानक तसेच स्मशानभूमी साठी सदरील जागेचे प्रयोजन करावे अशी मागणी भाजपाचे शहर उपाध्यक्ष सुनील चौधरी यांनी जिल्हाधिकारी याच्याकडे निवेदनाद्वारे केले आहे. 


निवेदनात म्हटले आहे की, नळदुर्ग नगरपरिषद हद्दीतील सर्वे नंबर २३६/२ व २३६/३  शासकीय जागा असून उपजिल्हा रुग्णालय व कचरा डेपो च्या बाजूला डॉ. बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृहाच्या पाठीमागे असलेली जागा कृषी कार्यालयासाठी देण्यात यावी, कारण कृषी कार्यालय हे भाडेतत्त्वावर आहे. तसेच नवीन बसस्थानका करीता सदरील जागेची व्यवस्था करावी, त्याचबरोबर भविष्याचा विचार करून नळदुर्ग शहरात तहसील कार्यालय, पंचायत समिती व न्यायालयासाठी जागा राखीव ठेवण्यात यावी, त्याचबरोबर वसंतनगर, दुर्गा नगर, इंदिरानगर, जगतापनगर, ठाकरेनगर व व्यासनगर येथील रहिवाशांसाठी स्मशानभूमीची अत्यंत आवश्यकता आहे, कारण नळदुर्ग शहरासाठी एकच स्मशानभूमी असून ती शहरापासून चार किलोमीटर अंतरावर आहे. त्यासाठी वाहनाची व्यवस्था नसल्याने अंत्यविधीसाठी जाण्याकरिता मोठी अडचण निर्माण होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी वरील सर्व बाबीचा विचार करून वरील कामांसाठी सर्वे नंबर 236 मधील शासकीय जागेचे प्रायोजन करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
 
Top