मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा उपक्रमास वगदरी येथे प्रतिसाद : उद्योजक प्रकाश सुरवसे यांनी शाळेला दिली ३१ हजार रुपयांची देणगी
नळदुर्ग, दि.१३ एस.के.गायकवाड
मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमास तुळजापूर तालुक्यातील वागदरी येथे उत्तम प्रतिसाद मिळत असून येथील उद्योजक श्रीपाद इलेक्ट्रिक वर्क चे मालक प्रकाश सुरवसे यांनी जि.प.प्राथमिक शाळा वागदरी च्या सुशोभिकरणासाठी दिली ३१ हजार रुपयांची देणगी.
प्रकाश लक्ष्मण सुरवसे यांनी जि.प.प्राथमिक शाळा वागदरी येथे आपले प्राथमिक शिक्षण पूर्ण करून वागदरी ते नळदुर्ग पायी चालत ये-जा करून उच्च माध्यमिक शिक्षण घेऊन छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत इलेक्ट्रिकचा व्यवसाय सुरु केला. छोटी मोठी इलेक्ट्रिकची कामे करत करत श्रीपाद इलेक्ट्रिक वर्क या नावाने उद्योग सुरु केला. आज छत्रपती संभाजी नगरात ते एक उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत.उद्योग सांभाळत त्यांनी गावची नाळ तुटू दिली नाही. मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा या उपक्रमात सहभागी होत त्यांनी ज्या शाळेत मी शिकलो त्या शाळेची गुणवत्ता वाढली पाहिजे. माझ्या गावची शाळा सुंदर असली पाहिजे या जाणीवेतून त्यांनी शाळेच्या सुशोभीकरणासाठी आपल्या मातोश्री सौ.रुक्मिणीबाई लक्ष्मणराव सुरवसे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका महादेवी जत्ते यांच्याकडे ३१ हजार रुपयांचा निधी सुपुर्द केला. याप्रसंगी शाळेच्या विविध विकास कामाचे व क्रीडा स्पर्धेचे उदघाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी मिटकर गुरुजी,उपसरपंच मिनाक्षीताई बिराजदार ग्रामपंचायत सदस्य ज्ञानेश्वर पाटील,सुरेखाताई यादव, अंकोल वाघमारे,सामाजिक कार्यकर्ते किशोर सुरवसे,माजी उपसरपंच दत्ता सुरवसे, गणपत सुरवसे,धरम सुरवसे, तात्याराव चव्हाण,दत्ता पाटील,महादेव बिराजदार, शंकर धुमाळ सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते