आठ दिवसांत कांदा निर्यातबंदी न उठविल्यास पुढार्यांना गावबंदी , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांचा सरकारला इशारा
तुळजापूर येथे रास्तारोको आंदोलन; रस्त्यावर कांदा फेकून केला निषेध
तुळजापूर,दि.१२
शेतकर्यांनी घाम गाळून पिकविलेल्या शेतीमालाला कवडीमोल भाव मिळत आहे. कांद्याचा भाव 10 रुपयावर आला आहे. तरीही शेतकर्यांचा कळवळा दाखविणार्या सरकारला जाग आलेली नाही. म्हणून कांद्यावरील निर्यातबंदी आठ दिवसांत न उठविल्यास पुढार्यांना गावबंदी करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला.
अग्रीम पीकविमा, कर्जमुक्तीसह शेतकर्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वात शेतकर्यांनी रस्त्यावर उतरुन जोरदार रास्तारोको केला. तुळजापुरातील जुन्या बस स्थानकासमोरील रस्त्यावर मंगळवारी (दि.12) दुपारी हे आंदोलन करण्यात आले. मंगळवार हा आठवडी बाजाराचा दिवस आणि देवी दर्शनासाठी येणार्या भक्तांची गर्दी यामुळे दोन्ही बाजुनी वाहतूक ठप्प झाली होती. सरकारने मागण्याची दखल घेऊन शेतकर्यांना न्याय दिला नाही, तर यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा यावेळी संघटनेेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांनी दिला.
अवर्षण, नापिकी, शेतीमालाला हमीभाव यासह अनेक समस्यांमुळे शेतकरी आज मरणाच्या दारात उभा आहे. परंतु केंद्र आणि राज्यातील सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या आत्महत्या आणखी वाढण्याची भीती आहे. म्हणून सरकारने शेतकर्यांच्या मागणीचा तातडीने विचार करुन निर्णय घ्यावा, असे यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे म्हणाले.
आंदोलनानंतर मागण्याचे निवेदन देण्यात आले. निवेदनामध्ये संपूर्ण धाराशिव जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, जिल्ह्यातील अनेक शेतकर्यांना अद्याप अग्रीम पीकविम्याचे वाटप झालेले नाही, ते तत्काळ वाटप करावे, कांदा निर्यातबंदी तत्काळ उठवावी, वन्य प्राण्यांपासून शेतकर्यांच्या पिकाचे संरक्षण करण्यासाठी तार कुंपण करण्यास शंभर टक्के अनुदान द्यावे, केंद्र सरकारने इथेनॉल निर्मितीवर घातलेली बंदी उठवावी, शेतकर्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्त करावे, शेतकर्यांचे वीजबिल पूर्णपणे माफ करावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
आंदोलनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, जिल्हा उपाध्यक्ष धनाजी पेंदे, जिल्हा संपर्कप्रमुख शहाजी सोमवंशी, राजाभाऊ हाके, दिलीप जोशी, सरदारसिंग ठाकूर, अभिजित साळुंके, दुर्वास भोजने, विश्वास भोसले, राजामामा भोसले, चंद्रकांत साळुंके, भिमराव पवार यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.