नळदुर्ग - विकास कामाचा सावळा गोंधळ, प्रशासनाचे दुर्लक्ष ?
नळदुर्ग, दि. १३:
नळदुर्ग नगरपालि च्या वतीने सहा महिन्यापूर्वी ६ जून २०२३ रोजी कार्यारंभ आदेश दिलेल्या विकास कामापैकी अनेक कामे मुदत संपल्यानंतरही (सहा डिसेंबर २०२३ ) मुदतवाढ न देताच सुरू आहेत. मुख्याधिकारी रजेवर असल्यामुळे कंत्राटदाराकडून काही कामे चक्क मुदत संपल्यानंतर नव्याने सुरू करण्यात आली आहेत. यामुळे शहरवासीयाकडून अश्चर्य व्यक्त केले जात आहे.
नळदुर्ग शहराच्या विकासासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या विकास निधीतून नगरपालिकेच्या वतीने ७ कोटी ३० लाख रुपये खर्च करून सिमेंट काँक्रीट रस्ते, गटारीचे बांधकाम, सभागृह बांधणे, गार्डन व ओपन स्पेस विकसित करणे, संरक्षक भिंतीचे बांधकाम, सार्वजनिक शौचालय बांधणे व व्यायाम शाळा इत्यादी कामे करण्यात येणार होती. या ३२ कामे सुरू करण्याकरिता ठेकेदाराला ६ जून २०२३ रोजी नगरपरिषद च्या वतीने कार्यारंभ आदेश देण्यात आला होता. मात्र सहा महिने पूर्ण होऊन सुद्धा शहरात काही विकासकामे सुरू आहेत. तर रहीम नगर येथे चक्क मुदत संपल्यानंतर कामास सुरूवात करण्यात आल्यामुळे अश्चर्य व्यक्त केले जात आहे. मुख्याधिकारी रजेवर असताना कंत्राटदार कामे सुरू करत असेल तर प्रशासकाच्या काळात होत असलेली कामे दर्जेदार होत असतील का? असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
सर्वच कामाचे कंत्राट उमरगा येथील गुत्तेदाराने घेतले आसले तरी प्रत्यक्षात या गुत्तेदारास कुठे विकासकामे सुरू आहेत हे माहित नाही कारण शहरातील भाजपाचे पदादिकारीच सर्व कामे करत असून हे काम करत असताना झालेले वाद, हेवेदावे यामुळे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनीही विकास कामाच्या भुमीपूजनाकडे पाठ फिरवली होती. नंतरच्या काळात या पदाधिकार्यांनी वाद मिटल्याचे नाटक करत तब्बल चार महिन्यात बत्तीस पैकी दोन पुर्ण झालेली कामे श्री पाटील यांना दाखवत डॕमेज कंट्रोल केले. तसेच भाजपाच्या दुसऱ्या फळीतील नाराज कार्यकर्यांनाही छोटी कामे देवून वाद मिटवण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. तसेच आमदार समर्थकातील वाद पाहता काही निधी नगरपिलिकेकडे न देता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वर्ग करण्यात आल्याचे बोलले जात आहे.