शिवलिंगेश्वर पुण्यस्मरणोत्सव सोहळयानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन
नळदुर्ग ,दि.०४
शहरातील श्री शिवलिंगेश्वर हिररेमठाचे निर्विकल्प समाधिस्थ राजगुरु श्री .ष.ब्र.१०८ शिवलिंगेश्वर शिवाचार्य महास्वामीजींची पुण्यस्मरणोत्सव निमित्त मंगळवार दि.५ डिसेंबर रोजी सकाळी ६ वाजता महारुद्राभिषेक ,दिक्षा आय्याचार, सकाळी १० वाजता धर्मसभा, विविध क्षेत्रातील मान्यावरांचा सत्कार ,महाप्रससादाचे वाटप करण्यात येणार आहे.
सोमवार दि. ४ रोजी संध्याकाळी जागरण, भजनाचा कार्यक्रम तर मंगळवार दि. ५ रोजी सकाळी ६ वाजता , शिवलिंगेश्वर गदगीस महारुद्र अभिषेक, सकाळी ७ वाजता दीक्षा व आय्याचार कार्यक्रम व नऊ वाजता निवृत्त शिक्षक , माजी सैनिक, पत्रकार , समाजसेवक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले आहे.
नळदुर्ग मठाचे मठाधिपती श्री बसवराज महास्वामीजी यांचा अमृतवाणीने धर्मसभा व आशीर्वचन व त्यानंतर श्री चंद्रशेखर गंगाधर माळगी रा गडहिंग्लज जि. कोल्हापूर यांच्यावतीने महाप्रसाद वाटपाचे कार्यक्रम होणार आहे.
तरी नळदुर्ग शहर व परिसरातील श्री शिवलिंगेश्वर हिरे मठाचे शिष्यगण, व भक्तानी कार्यक्रमास उपस्थित राहून लाभा घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.