नळदुर्ग दि.२६ :
येडोळा ता.तुळजापूर येथे श्री ग्रंथराज पारायण सोहळा दि.१२ ते १८ जानेवारी या कालावधीत होत आहे. त्यानिमित्त प्रवचन, कीर्तन, हरिजागर यासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ज्ञानेश्वरी पारायणचे २४ वे वर्षे असून व्यासपीठ चालक ह.भ.प. रामकृष्ण महाराज तोरंबकर आहेत. पहाटे काकडा आरती, सकाळी माऊली पूजा त्यानंतर सामूहिक ज्ञानेश्वरी वाचन दुपारी २ ते ४ गाथा भजन, ४ ते ६ प्रवचन व नामजप, सायंकाळी ६ ते ७ हरी पाठ, रात्री ९ ते ११ कीर्तन, ११ ते ४ हरिजागर आदी दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
दि १२/०१/२०२४ रोजी ह.भ.प. हरिदास महाराज मुंडे यांचे प्रवचन तर ह.भ.प. गुरुवर्य महेश महाराज माकणीकर यांचे किर्तन, दि.१३ रोजी ह.भ.प. शेषराव महाराजांचे प्रवचन, ह.भ.प.राम महाराज गायकवाड यांचे कीर्तन दि.१४ रोजी, ह.भ.प. बलभीम बागल महाराजांचे प्रवचन, ह.भ.प.प्रल्हाद सरडे महाराज यांचे कीर्तन दि.१५. रोजी उब्रे महाराज यांचे प्रवचन, ह.भ.प. माऊली महाराज यांचे कीर्तन, दि.१६ रोजी ह.भ.प.राजकुमार पाटील महाराज, ह.भ.प.गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर, दि.१७ ह.भ.प. रामचंद्र कुंभार महाराज, ह.भ.प. ज्ञानेश महाराज वास्कर यांचे प्रवचन व कीर्तन होणार आहे.
दि. १८ रोजी सकाळी ८ ते ९ पसायादान, माऊली मिरवणुक, ह.भ.प. श्रीहरी ढेरे महाराज यांचे काल्याचे कीर्तन व ह.भ.प. रामकृष्ण महाराज तोरंबकर यांच्या हस्ते काला होणार आहे. यावेळी दिनकर भाऊराव पाटील यांच्या वतीने महाप्रसादाचे वाटप होणार आहे तरी भाविक भक्तांनी यांचा लाभ घेण्याचे आवाहन पारायण समिती व समस्त येडोळा गावकऱ्यांनी केले आहे.