बाळासाहेब ठाकरेनगर येथील विकास काम अंदाजपत्रकानुसार व दर्जेदार करण्याची मागणी

नळदुर्ग , दि. ०५ 

शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथिल ओपन स्पेस विकसित करण्याचे रखडलेले काम  अंदाजपत्रका प्रमाणे व गुणवत्तापूर्ण करावे, कामाची  त्रयस्तामार्फत गुणवत्ता तपासणी करावी अशी मागणी येथील नागरिकांनी गुरूवार  दि. ४ रोजी पालिका कार्यालतयीन अधिक्षक अजय काकडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

शहरातील बाळासाहेब ठाकरे नगर येथील खुली जागा विकसित करणे या अंतर्गत नगर पालिकेकडून करण्यात येणारे काम महिनाभरापासून रखडले आहे.  या जागेस संरक्षक भींत जाळी व अंतर्गत पेव्हर ब्लाॕक बसवण्यात आले आहेत मात्र गार्डन विकसित करणे, ओपन जीमचे साहित्य  व लहान मुलांचे खेळण्याचे साहित्य बसवणे हे काम होणे बाकी आहे. कामाच्या अंदाजपत्रकात याबात स्पष्ट उल्लेख असताना कंत्राटदाराकडून काम गुंडाळण्याचा प्रयत्न होत आहे . हे काम अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात यावे. आपूर्ण कामाचे बील अदा करू नये, अन्यथा आम्ही कायदेशीर व लोकशाही पद्धतीने आंदोलन करू यास अभियंता व प्रशासन जबाबदार राहतील असा इशारा दिला आहे.   

या निवेदनावर ठाकरे नगर येथील संतोष पाटील, अजय देशपांडे, भाऊराव मोरडे, रत्नाकर सुरवसे, पंडीत पाटील, आनंद काटकर,अशोक लोहार, गुलाब सय्यद, गोपीनाथ माने, वसंतराव देशपांडे, चंद्रकांत बनसोडे, बालाजी कुलकर्णी, संजय दशरथ जाधव , भगवंत सुरवसे आदींची  स्वाक्षरी आहे.
 
Top