नळदुर्ग ,दि. ०६

 श्रीरामाच्या मंगल अक्षता कलशाची सवाद्य भव्य मिरवणूक  काढण्यात आली .अयोध्येत येत्या २२ जानेवारी रोजी श्रीराम मुर्ती प्रतिष्ठापना सोहळा संपन्न होणार आहे. त्यानिमित्त अयोध्येतून मंगल अक्षता देशभरातील गावोगावी पोहोंचविण्याची मोहिम सुरु आहे. तो अक्षता कलश शनिवारी  तुळजापूर तालुक्यातील  खुदावाडी (ईश्वरवाडी) येथे दाखल झाला .

दरम्यान श्रीरामच्या जयघोषाने गावात  भक्तीमय वातावरण झाले . जागो जागी महिलांनी औंक्षण  करुन कलशाचे पुजन करीत दर्शन घेतले. .प्रत्येक  चौकात अक्षता कलशावर पुष्पवृष्टी करण्यात आली. यामध्ये  ढोल पथक गावातील भजनी मंडळी,व गावातील रा. स्व. संघाचे  संगमेश्वर पाटील, महादेव सालगे, पांडुरंग बोंगरगे, दगडु सालेगावे, संजय बोंगरगे, तालुका अध्यक्ष केदारनाथ पाटील, निसर्ग सालेगावे, सागर कबाडे , ओमकार कबाडे, शंकर जवळगे, आकाश सालेगावे, मोहन कबाडे, विकास सांगवे, धनराज सालगे, दिलीप सालगे आदी   उपस्थित होते.
 
Top