बेरडवाडी जिल्हा परिषद शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती    

 मुरूम, ता. उमरगा,  दि. १९ 

बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी (ता. १९) रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष कांतराव मंडले, मुख्याध्यापक अनिल मुडमे, सहशिक्षक सुनिल राठोड, युवराज चव्हाण, बालाजी भालेराव आदींच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. शाळेतील मुलांनी  मनोगत व्यक्त केले. बालाजी भालेराव, अनिल मुडमे यांनी मार्गदर्शन केले. सूत्रसंचलन युवराज चव्हाण तर आभार सुनिल राठोड यांनी मानले.      


फोटो ओळ : बेरडवाडी, ता. उमरगा येथील जिल्हा परिषद शाळेत शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मुख्याध्यापक, शिक्षक, ग्रामस्थ व विद्यार्थी
 
Top