शेवटच्या दिवसअखेर 36 उमेदवारांनी दाखल केले 50 नामनिर्देशनपत्र :  आतापर्यंत 75 व्यक्तींनी खरेदी केले 175 अर्ज

धाराशिव,दि.19 (माध्यम कक्ष) 

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्र दाखल करण्‍याच्या शेवटच्या दिवसअखेर म्हणजे 19 एप्रिल रोजी 36 उमेदवारांनी एकूण 50 नामनिर्देशनपत्र निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांच्याकडे दाखल केले.

       आज नामनिर्देशनपत्र दाखल करणाऱ्या उमेदवारांमध्ये आर्यनराजे शिंदे (अपक्ष),राजकुमार पाटील (अपक्ष), संजयकुमार वाघमारे (बहुजन समाज पार्टी),विलास घाडगे (अपक्ष), शामराव पवार (समनक जनता पार्टी), नवनाथ उपळेकर (अपक्ष), ॲड.विश्वजीत शिंदे (आदर्श संग्राम पार्टी), हनुमंत बोंदर (अपक्ष), योगीराज तांबे (अपक्ष),उमाजी गायकवाड (अपक्ष), सौ.अर्चना पाटील (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी), नेताजी गोरे (अपक्ष), समीरसिंह साळवी (अपक्ष), काकासाहेब खोत (अपक्ष), बाळकृष्ण शिंदे (अपक्ष), भाऊसाहेब आंधळकर (अपक्ष), सोमनाथ कांबळे (अपक्ष),गोवर्धन निंबाळकर (अपक्ष), काका कांबळे (अपक्ष), शेख नौशाद इकबाल (स्वराज्य शक्ती सेना पार्टी),राम शेंडगे (अपक्ष), नितीन मोरे (अपक्ष),अरुण जाधवर (ओबीसी बहुजन पार्टी),सिद्दीक इब्राहीम बोडीवाले (ऑल इंडिया मजलिस ए इलेहादुल मुस्लिमीन), वर्षा कांबळे (अपक्ष),भाऊसाहेब बेलुरे (अपक्ष), नितीन गायकवाड (अपक्ष) यांचा समावेश आहे.या 27 उमेदवारांनी 33 अर्ज दाखल केले. राजकुमार पाटील,सौ.अर्चना पाटील, नेताजी गोरे व ॲड.विश्वजीत शिंदे या उमेदवारांनी दोन व तीन नामांकन अर्ज दाखल केले आहे.शेवटच्या दिवसअखेर 36 उमेदवारांनी एकूण 50  नामनिर्देशनपत्र दाखल केले.शेवटच्या दिवशी 6 व्यक्तींनी 20 अर्जाची खरेदी केली.नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यापासून शेवटच्या दिवसापर्यंत 75 व्यक्तींनी 175 अर्ज खरेदी केले.
                 
 
Top