वागदरीतून अर्चनाताई पाटील याना मताधिक्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार : महायुतीच्या बैठकीत निर्धार 

वागदरी , दि.१९ :एस.के.गायकवाड

होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील भाजपा शिवसेना (शिंदे) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) रिपाइं (आठवले) व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील याना तुळजापूर तालुक्यातील वागदरी गावातून मताधिक्य मिळवून देण्यासाठी जाणिव पुर्वक प्रयत्न करणार असल्याचे कार्यकर्ते यांनी निर्धारपुर्वक बैठकीत सांगितले.

  जि.प.नंदगाव गटाचे गट प्रमुख सिध्देश्वर  कोरे यांनी वागदरी ता. तुळजापूर येथे उस्मानाबाद (धाराशिव) लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या सर्व घटक पक्षांच्या कार्यकर्त्यांची बैठक घेऊन महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) च्या अर्चनाताई पाटील यांच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून  विजयी करून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करा असे आवाहन केले असता उपस्थित कार्यकर्ते यांनी वागदरीतून अर्चनाताई पाटील याना मताधिक्य देण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
   
याप्रसंगी भिवा इंगोले, विवेकानंद मिलगीरे,अंगद जाधव, भाजपा वागदरी बुथ प्रमूख तथा पत्रकार किशोर धुमाळ, दत्ता पाटील,बाळू पवार, शिवसेनेचे  (एकनाथ शिंदे गट)  मदन पाटील, प्रकाश सुरवसे,मनसेचे गणेश बिराजदार, रिपाइं (आठवले) चे‌ एस.के.गायकवाड,अनिल वाघमारे अंबादास झेंडारे, ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, भालचंद्र यादव,किशोर सुरवसे,अमोल परीहार,रामसिंग परिहार किशोर सुरवसे,दत्ता पाटील,बाळु पवार,नेताजी माडजे, राजेंद्र बिराजदार,जितेंद्र पाटील .रामकृष्ण पाटील प्रशांत बिराजदार भालचंद्र यादव आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 
Top