रक्ताचा थेंब  न सांडता देशात समतावादी सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवणारे महामानव     डॉ.बाबासाहेब आंबेडकर : लोखंडे

वागदरी, दि.१६: एस.के.गायकवाड

विषमतावादी समाज व्यवस्थेला झिडकारुन महाडच्या चवदार तळे सत्याग्रहाच्या माध्यमातून रक्ताचा एक थेंबही न सांडता देशात समतावादी सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडवून आणणारे महामानव म्हणजेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर असल्याचे मत नळदुर्ग पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोखंडे यांनी जळकोट ता.तुळजापूर येथे बोलताना केले.
  

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी जळकोटच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी स.पो.नि.स्वप्निल लोखंडे हे बोलत होते.पुढे 

प्रारंभी साहाय्यक पोलिस निरीक्षक  स्वप्नील लोखंडे , जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गणेश सोनटके, आशोक पाटील , प्रकाश चव्हाणसह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून निळ्या ध्वजाचे ध्वजारोहण पत्रकार अरुण लोखंडे व ग्रा.प.सदस्य अंकूश लोखंडे याच्या हस्ते करण्यात आले.
  
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन  अरुण लोखंडे यांनी केले. यावेळी सरपंच अशोक पाटील,जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण,महेश कदम, कृष्णात मोरे,बसवराज कवटे,सुनिल माने लक्ष्मण,लोखंडे मुकेश लोखंडे,अभिमन्यू लोखंडे, हरिदास लोखंडे, शिवाजी लोखंडे,राजा माने,शिवदास गायकवाड,तुकाराम साखरे गणेश लोखंडे,बेबीसेन लोखंडे,लक्ष्मण लोखंडे, आशितोष भालेराव,जगदीश लोखंडे,अक्षय लोखंडे नारायण लोखंडे,पाडूरंग लोखंडे,सौ.नगीना लोखंडे, लता माने,सुप्रिया लोखंडे, माजी सरपंच ज्योती लोखंडे, आशा लोखंडे,बबीता लोखंडे,अस्मीता लोखंडे,वनिता लोखंडे, प्रतिक्षा लोखंडे, शोभा लोखंडे,जया माने, मंगल गायकवाड,  जयश्री लोखंडे साधाना,लोखंडे वर्षा गायकवाड,मनिषा गायकवाड,कांचन लोखंडे, सपना गायकवाड,शारदा लोखंडे,राधिका लोखंडे, अलका लोखंडे,जिजाबई लोखंडे,सुमन लोखंडे,सोनल भालेराव, श्यामल सोनकाबळे,प्रज्ञा माने, शर्मिला लोखंडे, जयंती उत्सव कमिटी अध्यक्ष प्रदिप लोखंडे ,उपाध्यक्ष सागर लोखंडे,सचीव प्रकाश लोखंडे,प्रविण लोखंडे अरविंद लोखंडे,स्वदेश लोखंडे,परमेश्वर लोखंडे, सतीश गायकवाड, जीवन गुळे सह कार्यकर्ते , ग्रामस्थ महिला  उपस्थित होते.  आभार जंयती कमेटीचे सहसचीव सतीश माने यानी मानले.
 
Top