काटी येथे राम नवमी व हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन 

काटी, दि. १५ : उमाजी गायकवाड 

तुळजापूर तालुक्यातील काटी येथील श्री हनुमान मंदिर  वेशी येथे दि.17 ते 23 एप्रिल 2024 या काळात श्री संत माणकोजी बोधले महाराज यांच्या कृपाशिर्वादाने अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आयोजित केला आहे.


बुधवार दि.17 रोजी हभप सोमनाथ महाराज कांबळे यांचे प्रवचन तर हभप गजानन भुमकर यांची कीर्तन सेवा होणार आहे. गुरुवार दि.18 रोजी विजय महाराज फंड यांचे प्रवचन तर हभप संतोष महाराज लहाने यांची कीर्तन सेवा होणार आहे.शुक्रवार दि.19 रोजी हभप नागेश महाराज निंबाळकर यांचे प्रवचन तर हभप प्रमोद महाराज माने यांची कीर्तन सेवा होणार आहे.शनिवार दि.20 रोजी प्रभाकर महाराज पारधे यांचे प्रवचन तर हभप संतोष महाराज काकडे यांचे हरिकिर्तन होणार आहे.रविवार दि.21 रोजी हभप ब्रम्हदेव महाराज कापसे यांचे प्रवचन तर हभप देवेंद्र महाराज दास यांचे हरिकिर्तन होणार आहे.सोमवार दि 22 रोजी हभप एकनाथ महाराज हुरडे यांचे प्रवचन तर हभप गणेश महाराज बरगे यांचे हरिकिर्तन होणार आहे.


मंगळवार दि.23 रोजी सकाळी नगरप्रदक्षिणा निघेल व काकासाहेब रोडे आणि भालचंद्र मासाळ यांच्या सहकार्यातून हभप कृष्णा महाराज चवरे यांचे काल्याचे कीर्तन होऊन अरुण केरबा शितोळे यांच्या तर्फे काल्याचा महाप्रसाद होईल. तरी भाविक भक्तांनी काया, वाचा, मनाने सहकार्य करुन  या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी व भजनी मंडळ काटी यांनी केले आहे.
 
Top