डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त मुरूम शहरात अभिवादन

मुरूम, ता. उमरगा, दि.१४

 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त मुरूम येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाच्या वतीने शहरातील डॉ. आंबेडकर वाचनालय प्रांगणात दि. १४ (रविवार) रोजी माजी मंत्री बसवराज पाटील, साखर संचालक राजेश सुरवसे यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन  करण्यात आले. 


धम्मचारी धम्मभुषण यांनी उपस्थित अनुयायी यांना त्रिशरण पंचशील देवून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष रशीद शेख, उपनगराध्यक्ष श्रीकांत बेंडकाळे, रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, उल्हास घुरघुरे, सुनिल राठोड, चंद्रकांत गोडबोले, विद्यासागर कांबळे, सिद्धेश्वर भालेराव, प्रा.अण्णाराव कांबळे, रुपचंद गायकवाड, राहुल गायकवाड, निर्मलकुमार लिमये आदींची उपस्थिती होती. 

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन संपन्न झाले. यावेळी सुरवसे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वाचन पंधरवडा सप्ताहाचे उद्घाटन झाले. राहुल लेजिम पथकाच्या वतीने लेझीमचे सादरीकरण करण्यात आले. जयंतीनिमित्त सिद्धेश्वर भालेराव यांच्या वतीने भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. नागनाथ बनसोडे यांनी केले. सूत्रसंचालन संतोष भालेराव   तर आभार मंडळाचे अध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी मानले. यावेळी मंडळाचे पदाधिकारी, नागरिक, महिला, युवक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top