वागदरीत विविध ठिकाणी डॉ.आंबेडकर जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न 

वागदरी, दि. १४ : एस.के.गायकवाड

भारतिय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्ताने वागदरी ता.तुळजापूर येथे विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करुन अभिवादन करण्यात आले.

   डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी वागदरीच्या वतीने येथिल भिमनगर मध्ये पंचशील बौद्ध विहार समाज मंदिराच्या प्रांगणात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादनाच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.प्रारंभी विद्याम सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर, सेवावृत्त पोलिस हवालदार संदिपान वाघमारे, माजी सरपंच ज्ञानेश्वर पाटील, पोलिस पाटील बाबुराव बिराजदार, कुंडलिक वाघमारे आदींच्या हस्ते तथागत भगवान गौतम बुद्ध व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिकरित्या बुद्ध वंदना घेऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले.

 याप्रसंगी  सेवानिवृत्त मुख्याध्यापक शिवाजी मिटकर गुरुजी यांचे मार्गदर्शनपर भाषण झाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचलन रिपाइंचे जिल्हा सचिव  एस.के.गायकवाड यांनी केले तर आभार  चंद्रकांत वाघमारे यांनी केले.यावेळी उत्तम झेंडारे, अनिल वाघमारे,दत्तू वाघमारे, महादेव वाघमारे,विलास बिराजदार,ग्रा.प.सदस्य अंकुल वाघमारे,ग्रा.प.सदस्या गुणाबाई बनसोडे भिमशाहीर शिवाजी वाघमारे,महादेव वाघमारे, हणमंत वाघमारेसह महिला युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
   

 ग्रामपंचायत कार्यालयात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सरपंच तेजाबाई शिवाजी मिटकर यांच्या हस्ते महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून अभिवादन करण्यात आले.यावेळी ग्रा.प.सदस्य ज्ञानेश्वर पाटील, अमोल पवार,अंकुल वाघमारे, मिनाक्षी बिराजदार, गुणाबाई बनसोडे, पोलिस पाटील बाबुराव बिराजदार,एस.के.गायकवाड, रामसिंग परिवार,विद्या बिराजदार, कविता गायकवाड, उज्वला वाघमारे, श्रीदेवी वाघमारे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
  
तसेच येथील जि.प.प्राथमिक शाळेतही भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त त्याना अभिवादन करण्यात आले यावेळी मुख्याध्यापिका महादेवी जते, सहशिक्षक तानाजी लोहार सहशिक्षिका मनिषा चौधरी,आर.पी.साखरे, अंगणवाडी कर्मचारी पद्मीनबाई पवार,रुपाली जाधव आदी उपस्थित होते.
 
Top