नळदुर्ग येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी , यावेळी पुतळ्याची करण्यात आली प्रतिष्ठापना

नळदुर्ग ,दि. १४  

समता , स्वतंत्र बंधुता आणि न्याय समानता आणि अखंडता सांगणारे  भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे १३३ व्या जयंतीच्या निमित्ताने नळदुर्ग शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या  पुतळ्याची भव्य मिरवणूक काढून भीमनगर येथे प्रतिष्ठापना करण्यात आली.

 त्याचबरोबर डॉ आंबेडकरनगर , इंदिरानगर , बुद्धनगर आदीसह विविध ठिकाणी  प्रतिमेचे  पुजन करण्यात आले. यावेळी अमरदीप लेझीम संघाच्या खेळाडूंनी आपली कला सादर केली.  भारतीय बौद्ध महासभा समता सैनिक दलाचे सैनिक राजरत्न बनसोडे , योगेश सुरवसे यांनी निळ्या ध्वजाला मानवंदना दिली. राष्ट्रवादीचे  नेते अशोक  जगदाळे यांच्या हास्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमचे पुजन करण्यात आले. 
 नळदुर्ग शहरात नविन  पुतळयाची मिरवणूक  डॉल्बी सिस्टीम लेझीम पथकासह काढण्यात आली . हि मिरवणूक डॉ बाबासाहेब आंबेडकर संविधान चौक अक्कलकोट रोड , बुद्धनगर  ,डॉ आंबेडकरनगर , मार्गे काढुन भिमनगर येथे  आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात समारोप करण्यात आले. यावेळी भिमसैनिक, डाँ बाबासाहेब आंबेडकर प्रेमी नागरिकासह  शहरातील अनेक मान्यवर  उपस्थित होते.
 
Top