पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या अबकी बार ४०० पार चा नारा सार्थ ठरवण्यासाठी व जनसेवेसाठी लोकसभेत संधी देण्याचे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी काॕर्नर बैठकीत  केले


नळदुर्ग, दि.१४

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या अबकी बार ४०० पार चा नारा सार्थ ठरवण्यासाठी घड्याळ  चिन्हासमोरील बटन दाबून जनसेवेसाठी लोकसभेत संधी द्यावी असे आवाहन अर्चनाताई पाटील यांनी केले.
धाराशिव लोकसभा मतदार संघ महायुतीच्या उमेदवार अर्चनाताई पाटील यांच्या प्रचारार्थ नळदुर्ग येथे कॉर्नर बैठकीचे नुकतीच  आयोजित करण्यात आली होती. यावेळी धाराशिव लोकसभा मतदार संघाच्या महायुतीचे उमेदवार अर्चनाताई पाटील व मल्हार राणाजगजितसिंह पाटील हे उपस्थित होते. महिलांच्या वतीने  उमेदवार अर्चनाताई पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

   
 यावेळी बोलताना अर्चनाताई पाटील यांनी म्हटले की, आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली तुळजापूर तालुक्याचा मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. नळदुर्ग शहराच्या विकासासाठी १५० कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. येणाऱ्या काळात शहराचा आणखी विकास व्हावा, यासाठी शहरातील मतदारांनी मला मतदान करावे. केंद्रात फिर एक बार मोदी सरकारच येणार आहे. त्यामुळे आपल्या लोकसभेचे खासदार देखील महायुतीचाच असायला हवा तरच भरघोस निधी मिळेल.  
   

या कॉर्नर बैठकीस मल्हार पाटील, माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे, नय्यर जहागीरदार, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शफीभाई शेख, माजी नगरसेवक संजय बताले, निरंजन राठोड, भाजपच्या उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष सुशांत भूमकर, भाजपाचे शहराध्यक्ष धीमाजी घुगे, भाजपचे सरचिटणीस श्रमिक पोतदार, भाजपचे माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, मनसेचे जिल्हा सरचिटणीस ज्योतिबा येडगे, मनसे शहराध्यक्ष अलिम शेख, मनसे शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी, रिपाइंचे शहराध्यक्ष मारुती खारवे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्ष अजित जुनैदी, बाबासाहेब बनसोडे, दुर्वास बनसोडे, लहुजी शक्ती सेनेचे शिवाजी गायकवाड, भाजपचे गणेश मोरडे, विशाल डुकरे, अक्षय भोई, सागर हजारे,  माजी नगराध्यक्ष मुनवर सुलताना कुरेशी, निर्मला गायकवाड, माजी नगरसेविका छमाबाई राठोड, माधुरी घोडके, यांच्यासह या कॉर्नर बैठकीस महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
Top