नळदुर्ग :  आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत ईद  -ए-मिलन कार्यक्रम उत्साहात साजरा

नळदुर्ग, दि.१३  

 माजी नगराध्यक्ष नय्यरपाशा जागीरदार यांच्यावतीने शहरातील हिंदू मुस्लिम बांधवांसाठी रमजान ईदचे औचित्य साधून ईद-ए-मिलन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. माजी नगराध्यक्ष नय्यर पाशा जागीरदार यांच्या वतीने मागील 25  वर्षांपासून ईद मिलन कार्यक्रमचे आयोजन केले जात आहे.  


या ईद मिलन कार्यक्रमाची सुरुवात हाफेज व खारी सय्यद मैनोद्दीन जागीरदार व अलहाज सय्यद फरहातुल्ला इनामदार व माजी नगराध्यक्ष नय्यर पाशा जागीरदार यांच्या हस्ते आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचा सत्कार करून करण्यात आला.

 यावेळी माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे,  शफीभाई शेख, माजी नगरसेवक बसवराज धरणे, संतोष बोबडे, पृथ्वीराज सिंह पाटील, ॲड.दिपक अलूरे, महादेव पाटील, समयोदिन मशायक, सुशांत भूमकर, धिमाजी घुगे, श्रमिक पोतदार, माजी नगरसेवक निरंजन राठोड, विनायक अहंकारी, हाजी मलंग शेख, अजित जुनोदी, ज्योतीबा येडगे, अलीम शेख, प्रमोद कुलकर्णी, समीर मोरे, मुद्दसर शेख यांच्यासह शहरातील विविध पक्ष व संघटनेचे नेते, कार्यकर्ते व शहरातील हिंदू मुस्लिम बांधव एकमेकांची गळाभेट घेत रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. 

ईद मिलन कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता गयाज जागीरदार, जिलानी कुरेशी, अबुल हसन रिजवी, जुबेर जागीरदार, रिजवान शेख, मुजम्मिल जागीरदार  इत्यादीनी परिश्रम घेतले.
 
Top