दहिटणा ग्रामपंचायतची माहिती आधिकारात माहिती देण्यास ग्रामसेवकाची टाळाटाळ
नळदुर्ग, दि.१३ : शिवाजी नाईक
तुळजापूर तालुक्यातील दहिटणा ग्रामपंचायतची माहिती आधिकारने माहिती मागितली असता ग्रामसेवकाने सदरील माहिती देण्यास टाळा टाळ करीत आहे. महाराष्ट्र शासकिय कामात विलंब करणेस प्रतिबंध करण्याचा अधिनियम २००५ अन्वये दोषींवर तुळजापूर पंचायत समितीचे गटविकास आधिकारी कारवाई करणार की पाठिशी घालणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
भ्रष्टाचाराची प्रकरणे उजागर करण्याकरिता माहिती अधिकारातून माहिती मागण्याचा अधिकार नागरिकांना प्राप्त झाला.अर्ज केल्यानंतर ३० दिवसांत माहिती देणे अनिवार्य असतानाही दिड महिना होत आला दहिटणा ता.तुळजापूर येथील ग्रामपंचायतीची सन 2019 पासुन ते 2022 या कालावधीतील मागणी केलेली माहिती शिवाजी नाईक याना दिली नाही. याप्रकरणी संबधित ग्रामसेवकाच्या पाठिशी वरिष्ठ आधिकारी असल्याने ग्रामसेवकाचे फावले जात आहे.
केंद्रीय माहितीच्या अधिकार कायद्याने अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे, तसेच कर्मचाऱ्यांचे पितळ उघड पडत आहेत. त्यातही प्रकार जर गंभीर असेल तर बघायलाच नको. आपल्यावर या माहितीतून आपत्ती येऊ शकते व आपला भ्रष्टाचार उघड होऊ शकतो, हे पाहून माहिती देणे टाळण्यावर आधिक भर देण्यात येत असल्याचे दिसुन येत आहे.