भाजपा सरचिटणीस विलास राठोड यांचा वाढदिवस अनोख्या उपक्रमाने साजरा
नळदुर्ग ,दि.१२
आलियाबाद ता.तुळजापूर येथील भाजपचे तालुका सरचिटणीस विलास राठोड यांच्या वाढदिवसा निमित्त विविध कार्यक्रमाने व अनोख्या पध्दतीने साजरा करण्यात आला.
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे जिल्हाध्यक्ष , माजी ग्रा. पं.सदस्य तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे विश्वासू कार्यकर्ते विलास राठोड यांच्या वाढदिवसानिमित्त आलियाबाद येथील शेतकऱ्यांना 101 केसर आंब्याची रोपे वाटप केले. तर रामतीर्थ ,रामनगर येथील शाळेच्या विद्यार्थ्याना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. त्याचबरोबर आपलं घर प्रकल्पा येथे जेष्ठ समाजसेवक पन्नालाल सुराणा यांच्या उपस्थितीत 120 विद्यार्थ्याना वही,पेन देऊन त्यांना मिठाई वाटून अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य मनोज चव्हाण ,लक्ष्मण राठोड,सीताराम चव्हाण रामू चव्हाण,श्रीमंत राठोड, दिनेश राठोड, हरीश राठोड,सचिन राठोड,वसंत पवार, गोविंद राठोड, मधुकर राठोड,संजय राठोड,हरिदास चव्हाण, आदी ग्रामस्थ ,शिक्षक वर्ग,विद्यार्थी,उपस्थित होते.