तिरंगा रॅलीत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग               ; घोषणाबाजीने वातावरण ढवळून निघाले  

            मुरूम, ता. उमरगा, दि. १४  :

 हर घर तिरंगा अर्थात घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत बुधवारी  रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालय, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली मुख्य रस्त्यावरून जाताना विद्यार्थ्यांनी तिरंगा ध्वज हातात घेऊन विविधतेत एकता, तिरंग्यात अभिमान, हर दिल में तिरंगा, हर हाथ में तिरंगा, तिरंगा हमारा, गर्व हमारा, हम सब का एक ही नारा, तिरंगा ऊँचा रहे हमारा, आओ मिलकर तिरंगा लहराएँ, देशभक्ति की भावना जगाएँ अशी घोषणाबाजी करत वातावरण ढवळून काढले. 

या रॅलीचा प्रारंभ प्राचार्य डॉ. अशोक सपाटे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोटरीचे पदाधिकारी प्रा. डॉ. आप्पासाहेब सुर्यवंशी, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. किरण राजपूत, डॉ. मुकुंद धुळेकर, परिवेक्षक सच्चिदानंद अंबर, डॉ. राम बजमिरे, डॉ. सोमनाथ बिरादार, डॉ. रमेश आडे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. प्रकाश कुलकर्णी आदींची प्रमुख उपस्थिती होती. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. प्रतापसिंग राजपूत, डॉ. शिला स्वामी, प्रा. अशोक बावगे, जगदीश सुरवसे, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. राजनंदिनी निमये, डॉ. महादेव कलशेट्टी, प्रा. गोपाळ कुलकर्णी, डॉ. नागनाथ बनसोडे, डॉ. नागोराव बोईनवाड, प्रा. सुदिप ढंगे, अमोल कटके, किशोर कारभारी, पंकज पाताळे, वीरेंद्र लोखंडे, सागर मंडले, सुभाष धुमाळ आदींनी पुढाकार घेऊन रॅली यशस्वी केली.                                   

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयाच्या वतीने तिरंगा रॅलीचे आयोजनाप्रसंगी अशोक सपाटे, प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक, स्वयंसेवक व अन्य.
 
Top