अखेर भोगवटदार नोंदीचे प्रमापञ 
आ राणाजगजितसिंह पाटील यांच्या हास्ते लाभार्थ्याना वितरण

नळदुर्ग , दि.१५

 शहरातील अक्कलकोट रोड सर्व्हे न. २९ मधील 
शासकिय जागेवर कब्जे वहिवाटीनुसार राहणाऱ्या ( बंजारा समाज) बेघर कुटुंबाना घरजागेची भोगवटदार  नोंदीचे प्रमाण पञ मंगळवार दि.१३ आँगस्ट रोजी नळदुर्ग शहर नवीन पाणी पुरवठा योजना भुमीपूजन समारंभाच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हास्ते लाभार्थ्याना देण्यात आले.


 शासकीय जागेवरील कुटूंबाच्या घर जागेची नोंद न.प. दप्तरी करावी,प्रधानमंञी आवास योजनेचा लाभ मिळावा या मागणीकरिता येथिल  नागरिकानी जिल्हा प्रशासन व न.प. प्रशासनास यापुर्वी वेळोवेळी निवेदन देवुन आदोंलन केले होते.  

नळदुर्ग शहर  भाजपचे पदाधिकारी व आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या घरजागेची नोंद धाराशिव जिल्हाधिका-यांच्या निर्देशानुसर नगरपालिकेने मालमत्ता कर भरुन  घेण्यास सुरु केले आहे. आमदार पाटील यांच्या हास्ते लाभार्थी पैकी जेष्ठ नागरिक नामदेव जाधव, फुलचंद जाधव , रेवु चव्हाण, श्रीमती शालुबाई राठोड, श्रीमती सुनिता राठोड याना नगरपरिषदेचे भोगवटदार  नोंदणी प्रमाणपञ देण्यात आले.  

यावेळी  आमदार पाटील यांचे बंजारा समाजाच्यावतीने पञकार शिवाजी नाईक , अविनाश बंजारे अरुण नाईक, प्रवीण पवार , नवल नाईक आदीनी शाल व पुष्पहार घालुन सत्कार केला. यानंतर नागरिकानी अक्कलकोट रोड येथे फटाक्याची अतिषबाजी करत व पेढे वाटून आनंद व्यक्त केला.

 
Top