महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी लाडकी बहीण योजना; विरोधकांचा अपप्रचार, विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखविण्याचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे आवाहन
वागदरी ,दि.२९:एस.के.गायकवाड
महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी , त्यांचा स्वाभिमान व सन्मान करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुती सरकार राबवित आहे.
यामुळे महिलाचं सक्षमीकरण होणार आहे .महायुती सरकारने महिलांचा आत्मसन्मान वाढवण्यासाठीच ही योजना राबवीत आहेत. विरोधक योजना बंद पडणार असल्याचे खोटे अपप्रचार करीत आहेत. त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्यांची जागा दाखवावी अशी प्रतिक्रिया भाजपाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी बोलताना केली.
तुळजापूर तालुक्यातील खुदावाडी येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा व महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते .आमदार राणाजगजीतसिंह पाटील व धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते महिलांना साड्या वाटप करण्यात आले. यावेळी आयोजित महिला मेळाव्यात आमदार पाटील बोलत होते . याप्रसंगी आमदार पाटील यांच्या शुभहस्ते खुदावाडीत विविध विकास कामाचा शुभारंभ व लोकार्पण करण्यात आले .
याप्रसंगी धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष आर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील , धाराशिव जिल्हा सरचिटणीस तथा महामंत्री ऍड.दीपक आलुरे ,सरपंच सरोजिनीताई रेवणसिद्ध कबाडे, तांडा समृद्धी योजनेचे सदस्य प्राचार्य संतोष चव्हाण , खुदावाडी शाखा प्रमुख तुकाराम बोंगरगे , भिवा इंगोले , भाजपा मिडिया सेल तालुका प्रमुख किशोर धुमाळ, पत्रकार एस.के.गायकवाड, सुरेश लोंढे,रामसिंग परीहार,बाळु पवार, किशोर सुरवसे ,व्यंकट साळुंखे, कल्याण बिराजदार,गुजनूर सरपंच फुलचंद वाघमारे, दिपक जाधव, अनिल पवार, तांडा समृद्धी योजनेची ध जिल्हा सहप्रवाशी दामाजी राठोड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना आमदार र पाटील म्हणाले की , मागील काळात महाविकास आघाडी सरकारने तुळजापूर मतदारसंघात म्हणावा तसा विकास केला नाही. जनतेने लोकसभा निवडणुकीत विरोधकाला खासदार म्हणून निवडून दिला. पण त्याचा तुळजापूर मतदारसंघात खरच काही उपयोग आहे का ? असा आरोप विरोधकावर करुन महायुती सरकारच्या काळात प्रचंड निधी आणून जिल्ह्याचा व तुळजापूर मतदारसंघाचा विकास करतोय. तसेच महिला भगिनींवरील अन्याय, अत्याचार विरोधात महिलांच्या सेवेकरीता हेल्पलाईन सुरू करीत आहे. एक फोन करा नक्कीच आपणास मदत करणार असून लाडकी बहीण म्हणून आपल्या पाठबळाची मला गरज आहे.
नळदुर्ग येथे महात्मा बसवेश्वर सृष्टी , वसंतराव नाईक स्मारक , बौद्ध विहार , एम आय डी सी , शादी खाना , यासह नळदुर्ग तालुका निर्मितीचा प्रश्न मार्गी लावणार असल्याची माहीती दिली .आयोजित स्त्री सन्मान सोहळा व महिला मेळावा कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक ताराबाई पवार , बंजारा क्रांती दलाचे युवा आघाडी जिल्हाप्रमुख महेश चव्हाण, भाजपाचे खुदावाडी बुथ प्रमुख आनिल पवार , विकास सांगवे , धनराज सालगे , महिला बुथ प्रमुख गुरूदेवी तुकाराम बोंगरगे , विद्या बिराजदार,पार्वती बिराजदार, कोमल झेंडारे, रेखा कदम, दहीटणा सरपंच शिवकांता कांबळे, भागश्री माने,नेताजी माडजे,गौरा प्रकाश सालगे ,अमरजा प्रकाश कबाडे , सिमा विलास पवार आदीसह भाजपाचे कार्यकर्ते , बचत गटातील महिला , खुदावाडी पंचायत समिती गटातील , वागदरी , गुजनूर , दहीटणा येडोळा, रामतीर्थ गावातील महिला उपस्थित होत्या.