आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता महत्त्वाची असुन स्वच्छतेला प्राधान्य देणे गरजेचे - प्राचार्य सुभाष राठोड 

नळदूर्ग,दि.२९: एस के गायकवाड 

 आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता महत्त्वाची असून आजारी पडल्यावर उपचार करण्यापेक्षा आजारी पडू नये म्हणून प्रत्येक रोगांवर रामबाण प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे स्वच्छता होय.त्याकरिता आपल्या घरापासून ते गल्ली, गाव, सार्वजनिक ठिकाणे हे स्वच्छ ठेवणं आवश्यक असल्याचे प्रतिपादन कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य सुभाष राठोड यांनी महाविद्यालयात स्वच्छता पंधरवाडा निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलताना केले.

नळदुर्ग शहरातील कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात  ' स्वच्छताही सेवा-२०२४' अंतर्गत १७ संप्टेबर ते २ ऑक्टोबर दरम्यान 'स्वभाव स्वच्छता  आणि  संस्कार स्वच्छता '  पंधरवाडा साजरा करण्यात येत असून या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
 
प्रारंभी प्राचार्य डॉ.सुभाष राठोड, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी, ग्रीन क्लब समन्वयक, राष्ट्रीय छात्र सेना  अधिकारी आणि सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि  विद्यार्थ्यांनी स्वच्छेतेची शपथ घेतली.त्यानंतर या  स्वच्छता पंधरवाडा बाबतचे महत्त्व  आणि  महाविदयालयीन विद्यार्थ्यांची भूमिकाबाबत राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी 
प्रा.दादासाहेब जाधव यानी विषद केली. तर प्राचार्य डॉ.सुभाष राठोड यानी  स्वच्छेते विषयी विविध कार्यक्रम कोणते व कसे घ्यायचे याबाबत मार्गदर्शन केले. 
  

त्यानंतर  महाविदयालयातील ग्रीन क्लब, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेनातील विद्यार्थी विद्यार्थ्यांनीनी महाविद्यालय परिसरातील कचरा प्लॉस्टीक, गवत,वृक्षाजवळील तृण आदी स्वच्छता करून  सर्वजण नळदुर्ग बसस्थानक याठिकाणी जावून  बसस्थानक परिसर स्वच्छ करून ओला, सुका कचरा, प्लास्टीक आदी वेगळे करून कचरा कुंडीत टाकण्यात आला.    त्यानंतर काही दुकानदार आणि नागरिकांच्या स्वच्छतेविषयीच्या मुलाखती घेण्यात आल्या आणि नळदुर्गवासियानी  या कार्याचे महाविद्यालयाचे आणि विध्यार्थ्यांचे  कौतूक आणि अभिनंदनही केले. पुढे नळदुर्ग येथील  आलियाबाद येथील  स्मशानभूमिकडे विद्यार्थ्यांचा ताफा वळवला गेला आणि तेथील सर्व कचरा , वाढलेली झाडे, गवत काढले गेले. त्यानंतर नळदुर्ग येथील असलेल्या भूईकोट किल्याच्या पायथ्याला असलेल्या आणि स्मशान भूमिच्या बाजूला असलेल्या नदीतील कचरा, प्लॉस्टीक, शेवाळ, लाकडे आदी स्वच्छ करण्यात आले.

 ही मोहीम यशस्वी होण्यासाठी ग्रीन क्लब समन्वयक प्रा डॉ उध्दव भाले, प्रा डॉ निलेश शेरे, प्रा डॉ हंसराज जाधव, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा दादासाहेब जाधव, प्रा बाबासाहेब सावते, प्रा डॉ युवराज पाटील, राष्ट्रीय छात्र सेना अधिकारी लेप्टन्ट प्रा डॉ अतिश तिडके यांनी परिश्रम  घेतले. 
 
Top