नळदुर्ग येथे महिलांना भेट म्हणून साडी वाटप ; विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या महिलांचा गौरव
नळदुर्ग,दि.२९: नवल नाईक
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार स्त्री शक्तीचा सन्मान करत आहे. याच अनुषंगाने नळदुर्ग शहरातील श्री अंबाबाई मंदिर सभागृहात आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी जि.प. अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते उपस्थित महिलांना भेट म्हणून साडी वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटील बोलताना म्हणाले की, नळदुर्ग येथे अप्पर तहसील कार्यालयास मंजुरी मिळाली असून नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे पाऊल आहे. शहरासाठी पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून काम पूर्ण झाल्यानंतर शहरातील प्रत्येक घरात दररोज पाणीपुरवठा होणार आहे. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मागण्यांना प्रतिसाद देत, विविध प्रकल्पांचे नियोजन आणि अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. १०० कोटींचे रस्ते, नाले, बगीचे, आणि विविध समाजांसाठी आवश्यक असणारी सभागृहे उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.
शादीखाण्याची सुविधा मिळावी यासाठी २ कोटींची विशेष मदत मंजूर करण्यात आली आहे. याशिवाय बौद्ध समाजासाठी ५ एकर जागा देऊन बौद्ध विहाराची उभारणी करण्यात येणार आहे, ज्यामुळे आध्यात्मिक आणि सांस्कृतिक उन्नतीला नवी दिशा मिळेल. आधुनिक शिक्षण आणि तंत्रज्ञानाच्या गरजांना प्रतिसाद देत, आपल्या मुलांना नवीन तंत्रज्ञानाची उपलब्धता व्हावी, यासाठी १ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या वाचनालयामुळे विद्यार्थ्यांना प्रगतीची नवी वाट मिळेल आणि तंत्रज्ञानाच्या ज्ञानाशी त्यांचा संपर्क वाढेल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला भगिनींचा सत्कार करून गौरव करण्यात आला.
उल्लेखनीय कार्य केलेल्या बचत गटाच्या अध्यक्ष मिरा महाबोले, उद्योजिका कल्पना गायकवाड, डॉ. स्वाती पाटील, सामाजिक कार्यकर्त्या शाहेदाबी सय्यद, जलतरणपट्टू अश्वेता गायकवाड, सहशिक्षिका कविता पुदाले, बचत गटाच्या अध्यक्षा शिल्पा पुदाले आदींचा गौरव करण्यात आला.
यावेळी भाजपचे नळदुर्ग शहराध्यक्ष धिमाजी घुगे,
भाजयुमोचे जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदार, युवामोचे शहराध्यक्ष गणेश मोरडे, माजी नगरसेवक निरंजन राठोड, ,रिपाईचे शहराध्यक्ष मारुती खारवे, शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर घोडके, भाजपचे सुशांत भूमकर, माजी नगराध्यक्ष नय्यर जहागीरदार, माजी नगरसेवक संजय बताले, रणजितसिंह ठाकुर
बबन चौधरी,शशिकांत पुदाले, , दत्तात्रय कोरे, माजी शहराध्यक्ष पद्माकर घोडके, अक्षय भोई, रियाज शेख , गौस शेख, एस के बागवान,
मुद्दसर शेख, बंडोपंत पुदाले ,किरण दुसा, सागर हजारे ,अबुल हसन रजवी, गणेश नन्नवरे, अजय दासकर, सुमित यादगिरे, सुशांत साखरे ,अमित कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार माधुरी घोडके यांनी मानले.