नळदुर्ग : जय हनुमान तरुण गणेश मंडळ  स्तुत्य उपक्रम ; वर्गणी न घेता शाळेसाठी दिला पंखा

नळदुर्ग ,दि.०५

सध्या गणेशोत्सवाची  जय्यत तयारी  सर्वत्र  जोरदार चालू  असुन गणेशाच्या आगमनापूर्वी   बरेच मंडळे वर्गणी गोळा करण्यासाठी फिरताना दिसत आहे.पण वसंतनगर नळदूर्ग येथील जय हनुमान गणेश तरुण मंडळाने शिक्षकाकडून वर्गणी न घेता शाळेतील शिक्षकांच्या वर्गणीच्या पैशातून उष्णतेपासून  विद्यार्थ्यांचा बचाव व्हावा म्हणून वर्गात लावण्यासाठी पंखा मंडळाचे अध्यक्ष  संतोष घाटे यांच्या हस्ते शिक्षक दिनी गुरुवारी शाळेस भेट दिला.

याबद्दलशाळेचे मुख्याध्यापक   कुलकर्णी विकास यांनी आभार व्यक्त केले.यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी गावातील सर्वच मंडळांनी अशा प्रकारचा उपक्रम राबवून शाळा विकासात आपला सहभाग नोंदवावा असे मत सांस्कृतिक विभाग प्रमुख, सोनवणे डी.एन.यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवी राठोड,प्रमुख पाहुणे  नवनाथ पवार,सौ.प्रिती जाधव,  संतोष घाटे ,शाळेतील  सुरवसे एच. एम.,कुलकर्णी श्रीकृष्ण,  राठोड अविनाश, श्रीमती वाघमारे वंदना, कुंभलकर नेहा, राठोड रवीना हे शिक्षक  विद्यार्थी उपस्थित होते.
 
Top