राष्ट्रवादीचे नेते अशोक जगदाळे यांनी घेतली मराठा आरक्षण संघर्ष योध्दा मनोज जरांगे पाटील यांची भेट
नळदुर्ग, दि.५
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अशोक जगदाळे यानी बुधवार रोजी मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली सराटी, जि. जालना येथे भेट देऊन श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा व कवड्याची माळ देऊन सत्कार केला.
यावेळी अमर चोपदार, नितीन कासार, अमृत पुदाले, दीपक काशीद, रमेश जाधव, ताजुद्दीन शेख, नानासाहेब पाटील, राजकुमार पाटील, शिवाजी सावंत, राजकुमार बोबडे, सतीश माळी, सिकंदर भेगडे, शहाजी सोमवंशी, आकाश मुंगळे, पांडुरंग माने, ज्योतिबा जाधव, संजय जाधव, दिनकर जगताप, विक्रम जाधव, अरुण काळे, धनराज पाटील, रामकृष्ण पाटील, प्रशांत कुदळे, शिवाजी मते, दाजी पाटील, बाळासाहेब मते, अभिजीत पाटील, गडाजी येळणे आदी उपस्थित होते.