बंजारा समाजाच्या वतीने व नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्यावतीने विलास राठोड यांचा गौरव
नळदुर्ग, दि.०५
बंजारा समाजाच्या वतीने व नळदुर्ग शहर पञकार संघटनेच्यावतीने धाराशिव संत सेवालाल महाराज बंजारा (लमाण तांडा) समृध्दी योजनेच्या अशासकीय सदस्यपदी विलास राठोड यांची निवड झाल्याबद्दल गुरुवार रोजी नळदुर्ग शहरात सत्कार करण्यात आला.
शासनाच्या विविध योजनांची माहिती भटक्या, विमुक्त जाती , इतर मागास प्रवर्ग बहुजनांच्या वाडी , वस्ती तांडाच्या शेवटच्या घटकांपर्यंत पोहोचवुन बंजारा समाजाच्या विकासासाठी भाजपचे आमदार राणाजगजितसिंंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वतोपरी प्रयत्नशिल असल्याचे मनोगत विलास राठोड यानी सत्काराला उत्तर देताना सांगितले .
प्रारंभी शहर पञकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे, पञकार विलास येडगे , भागवंत सुरवसे, शिवाजी नाईक , उत्तम बणजगोळे, सतीशा राठोड, अय्युब शेख, लतीफ शेख, अजित चव्हाण, माजी नगरसेवक सुधीर हजारे, सोसायटीचे संचालक रघुनाथ नागणे, आमर भाळे आदीच्या प्रमुख उपस्थितीत विलास राठोड यांचा शाल , फेटा , पुष्पहार घालुन पेढा भरवुन गौरव करण्यात आला. त्याचबरोबर बंंजारा समाजाच्यावतीने किरण राठोड, अविनाश बंजारे, नवल नाईक, अरुण नाईक,
शिवाजी नाईक ,श्रीमंत राठोड, सचिन राठोड, अविनाश राठोड, आदीनी सत्कार केला.
पुढे बोलताना विलास राठोड म्हणाले की, शासनाच्या वतीने इतर मागास बहुजन प्रर्वागाच्या कल्याणा करिता विविध योजना सुरू केल्या आहेत. या योजनांची माहिती नसल्याने शासनाच्या लोक कल्याणकारी योजनेपासून तळागाळातील बंजारा समाज वंचित आहे . शासनाच्या विविध योजना वाडी, वस्ती तांड्या पर्यंत पोहचवुन विकास करणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार सतीश राठोड यांनी मानले.