नळदुर्ग महाविदयालयाला ग्रीन क्लबचे महाराष्ट्र शासनाचे राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरिय पुरस्कारासाठी निवड

नळदुर्ग,दि.०६ : मारुती बनसोडे

शहरातील बालाघाट शिक्षण  संस्थेच्या कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयास  ग्रीन क्लबने महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार नामांकन घोषित केले आहे.


 महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग, एक्वाडाम, सेंटर फॉर एन्व्हायरमेंट एज्युकेशन,व्हाय वेस्ट आणि युनिसेफच्या संयुक्त विद्यमाने युवा सहभाग जलप्रबंधन कार्यक्रम राज्यात २०२३ ते २०२५ या दरम्यान राबवीला जात आहे. या मोहिमेत वेगवेगळ्या जल संरक्षण पद्धतीच्या अवलंबनाने अंदाजे ४० दशलक्ष घन लिटर पाणी वाचण्याची संकल्पना आहे. या अभियानांतर्गत राज्यातील 13 निवडक जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयात शिकत असलेल्या युवक,युवतीची वातावरण, हवामान बदल आणि पाणीबचत याविषयीची माहिती वृद्धिंगत करणे , कौशल्य विकसीत करण्यासाठी प्रशिक्षण घेणे  आणि पाणी बचतीचे उपाय योजना राबवणे इत्यादी उपक्रम राबविले जात आहेत या उपक्रमात विविध विद्यापीठाच्या १३ जिल्ह्यातील महाविद्यालयातील निवडक विद्यार्थी विद्यार्थिनी प्रत्यक्ष सहभागी होऊन जल संरक्षण संदर्भातील मोहीम युवा पिढीच्या हातात दिल्यानंतर ते पूर्ण होईल असा विश्वास शासनाकडे होता आणि त्यामुळे चोहीकडे सर्व महाविद्यालयातून ग्रीन क्लब ची २०२३ -२४ मध्ये प्रत्येक महाविद्यालयात स्थापना करण्यात आली. 

त्यामध्ये विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी कार्य कसे करावेत समाजामध्ये , गावागावांमध्ये पाणीबचत व अन्य नैसर्गिक संसाधनाचे संगोपन आणि संरक्षण कशा प्रकारे करावे या संबंधाने जनजागृती करून हवामान कृतीसाठी युवा नेतृत्व ही संकल्पना समोर ठेवून हवामान बदल, जल व्यवस्थापण, पाणीबचत , ऊर्जा व्यवस्थापन , कचरा व्यवस्थापन आणि जैवविविधता संवर्धन इत्यादी बाबीवर लक्ष केंद्रित केले गेलेले आहे.

 कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग येथील  ग्रीन क्लब ने महाराष्ट्र सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रालयाने राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार नामांकन घोषित केले आहे. त्यामध्ये सर्व बाबींमध्ये नळदुर्ग महाविद्यालयाने १०० पैकी ९९ गुण प्राप्त केलेले आहेत. या अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये महाविद्यांमध्ये ग्रीन क्लब ची स्थापना करून महाविद्यालय स्तरावर निर्माल्य जमा करणे, ग्रामीण भागात शोषखड्डे व पाझर खड्डे बनवण्यास प्रवृत्त करणे गळक्या नळांची  दुरुस्ती त्यासंदर्भाने प्रात्यक्षिक, पाणी व ऊर्जा बचतीचे मूल्यांकन अशा बऱ्याच प्रशिक्षण कार्यशाळा या उपक्रमात राबवून वातावरणीय बदलांच्या (climate change) वाढीस रोखण्याचा सकारात्मक असा प्रयत्न ग्रीन क्लबच्या माध्यमातून केला जात आहे.


 ग्रीन क्लब च्या माध्यमातून जागतिक जल दिन २०२४ मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने राज्य आणि जिल्हास्तरावर विविध गटातील स्पर्धेचे पुरस्कार जाहीर झालेले आहेत त्यामध्ये कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय नळदुर्ग ता तुळजापूर जिल्हा धाराशिवला एकाच वेळी महाराष्ट्र शासनाचे असे एकूण चार पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. त्यामध्ये "राज्यस्तरीय उत्कृष्ठ ग्रीन क्लब पुरस्कार , जिल्हास्तरीय उत्कृष्ट ग्रीन क्लब पुरस्कार , जिल्हास्तरीय उत्कृष्ट व्हिडिओ द्वितीय पुरस्कार , जिल्हास्तरीय उत्कृष्ट पोस्टर तृतीय पुरस्कार.अशी एकूण एकाच वेळी महाराष्ट्र शासनाचे चार पुरस्कार मिळवणारे  महाराष्ट्रातील पहिले महाविद्यालय आहे. 



मागील प्राचार्य डॉ संजय कोरेकर यानी या कार्यासाठी समन्वयक म्हणून प्रा डॉ उध्दव भाले यांची निवड केली होती.हे सर्व ग्रीन क्लबचे कार्य प्रभावीपणे  राबवणारे या ग्रीन क्लबचे समन्वयक व वनस्पतीशास्त्र विभागाचे प्राध्यापक प्रा डॉ  उद्धव भाले  हे आहेत.या ग्रीन क्लब मध्ये सहकार्य करणारे सह समन्वयक प्रा डॉ निलेश शेरे प्रा डॉ हंसराज जाधव , बारीक शिंदे आणि महाविद्यालयातील  सर्व ग्रीन क्लब  मधील विद्यार्थी विद्यार्थिनी यांचेही सहकार्य लाभले.या सर्व कार्यासाठी आणि यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुभाष राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचबरोबर कार्यालयीन अध्यक्ष  धनंजय पाटील यांनीही सहकार्य केले. त्याचबरोबर महाविद्यालयातील सर्व विभाग प्रमुख, सर्व फॅकल्टीतील प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी यांनीही वेळोवेळी सहकार्य केले.या यशाबद्दल बालाघाट शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा माजी कॅबिनेट मंत्री मधुकरराव चव्हाण, सचिव  उल्हास बोरगावकर, कार्याध्यक्ष रामचंद्र आलूरे, संचालक  बाबुराव चव्हाण, शहाबाज काजी , प्रकाश चौघुले , प्रदीप मंटगे, लिंबराज कोरेकर सर्व शिक्षक शिक्षेकेतर कर्मचारी व गावातील नागरिकांनी अभिनंदन केले.
 
Top