लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या उत्कृष्ट जयंती उत्सवांना पारितोषिक वितरण
इटकळ, दि.०६
साई मंगल कार्यालयात ता. ५ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला.लहुजी शक्ती सेनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णू कसबे हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. लहुजी चौकात प्रमुख मान्यवरांच्या आगमनानंतर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली.साई मंगल कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. स्वागत समारंभ नंतर जिल्ह्यातील अण्णाभाऊ साठे जयंती उत्सवामध्ये उत्कृष्ट जयंती काढलेल्या ७५ गावातील अध्यक्षांना सन्मान चिन्ह ,पुष्पहार ,टोपी, शाल देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी धाराशिव, सोलापूर ,बीड ,येथील विविध तालुक्यातील पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी शिवाजी गायकवाड, दिलीप गायकवाड, सुरेश भिसे, सुधाकर पाटोळे, सुनील मोरे, सुधाकर बनसोडे,अनिल सगट, राम कांबळे,संतोष मोरे, सोमनाथ गुड्डे, रोहित खलसे ,सागर कसबे ,पांडू चांदणे, आकाश शिंदे ,महेश देडे ,सुभाष गवाळे ,कचरु सगट, ,किशोर साठे, दयानंद काळुंके किसन देडे ,सुरज सगट, रामजी गायकवाड, दशरथ झेंडे ,एलजी गायकवाड,बाळू देडे उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवाजी गायकवाड व सुत्रसंचलन प्रा. संतोष पवार यांनी केले. आभार कार्यक्रमाचे आयोजक रोहित गायकवाड यांनी मानले.या कार्यक्रमासाठी आजय गायकवाड,जिवण क्षिरसागर, पांडुरंग वाघमारे,भरत देडे,राम गायकवाड, धनराज क्षिरसागर, नामदेव गायकवाड , नवनाथ गायकवाड, बबलू गायकवाड ,आनंद गायकवाड, नितीन क्षीरसागर, प्रशांत गायकवाड यांनी सर्वांनी परिश्रम घेतले .