नळदुर्ग शहरातील महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ,स्त्री शक्तीचा सन्मान मातृ शक्तीला आधार अनुषंगाने साडी वाटपाचा कार्यक्रम
नळदुर्ग,दि.२७:
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार स्त्री शक्तीचा सन्मान करत आहे. या अनुषंगाने सौ.अर्चना पाटील यांच्या पुढाकारातून नळदुर्ग शहरातील अंबाबाई देवस्थान सभागृहात दि.२८ सप्टेंबर रोजी शहरातील महिला भगिनींना साडी वाटप करण्यात येणार आहे.
नळदुर्ग येथिल वसंतनगर, दुर्गानगर ,इंदिरानगर, व्यासनगर, नानीमा रोड, हत्ती गल्ली, मराठा गल्ली, बेडगे गल्ली, ब्राह्मण गल्ली, कासार गल्ली, बागवान गल्ली, बाजार लाईन, काजी गल्ली, मोहम्मद पनाह गल्ली, कुरेशी गल्ली, साठेनगर ,भीमनगर, बुद्धनगर , शिवकरवाडी, रहीमनगर आदीसह शहरातील महिला भगिनींना साडी वाटपाचा कार्यक्रम उद्या दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजता श्री अंबाबाई देवी मंदिर, नळदुर्ग येथे तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी या कार्यक्रमास शहरातील महिला भगिनींनी उपस्थित राहाण्याचे आवाहन नळदुर्ग शहराध्यक्ष धिमाजी घुगे, भाजयुमो जिल्हा चिटणीस श्रमिक पोतदारसह महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.