नळदूर्ग येथे सीटीईटी, टीईटी कार्यशाळा संपन्न 

नळदुर्ग,दि.२८:
 शुक्रवार दि. 27 सप्टेंबर  रोजी अध्यापक विद्यालय नळदुर्ग येथे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था धाराशिव आयोजित सी.टी.ई.टी., टी.ई.टी. व स्पर्धा परीक्षा कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

 सदर कार्यशाळा जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे  प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे  यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या कार्यशाळेस तज्ञ मार्गदर्शक म्हणून श्री. उमेश नरवडे , श्री.शेख शरीफ , श्री.मिलिंद अघोर ,  श्री. बाळकृष्ण उंबरे व श्री. चौधरी होते.  कार्यशाळेत तज्ञांनी मार्गदर्शन केले .या कार्यशाळेला अध्यापक विद्यालय नळदुर्गचे  प्राचार्य  श्री. सुरेश अंकुशराव , प्रा. भीमाशंकर कोणदे , प्रा. उल्हास झालटे  प्रा. मनोज पवार , प्रा. पद्माकर कोलतमे , प्रा. श्रीमती विजयश्री निर्मळे  , प्रा. श्रीमती धनश्री पुराणिक , श्री सुरवसे बालाजी , श्री भोसले भास्कर आदीसह  डी.एल.एड. चे  प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
 
Top