तुळजापूर, नळदुर्गसह परिसरातील अनेक गांवाची तहान भागवणारा कुरनूर ( बोरी ) प्रकल्प तुडुंब भरून ओसंडून वाहण्यास सुरूवात
धाराशिव पाटबंधारे उपविभाग नळदुर्ग क्र.७ अंतर्गत १२ तलाव तुडुंब भरले तर २० तलाव अजुनही दमदार पावसाच्या प्रतीक्षेत
नळदुर्ग,दि.२६: नवल नाईक
श्री क्षेत्र तुळजापूर, अणदुर, नळदुर्ग शहरासह इतर गावाची तहान भागवणा-या बोरी ( कुरनूर मध्यम प्रकल्प) धरणाच्या पाणलोट क्षेत्रात परतीचा पाऊस चांगला झाल्याने बुधवारी पाण्याने तुडुंब भरून ओसंडून वाहत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त केला जात आहे.एकुण क्षेत्र ३ हजार ६०० पैकी २ हजार २०० हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
नळदुर्ग येथील बोरी धरण शंभर टक्के (एकुण ३५.२६ दलघमी) भरले असुन जिवंत पाणी साठा ३२.२८दलघमी साठा झाला आहे.तर खंडाळा मध्यम प्रकल्पात अवघे ११ टक्के पाणीसाठा आहे. नळदुर्ग पाटबंधारे उपविभाग कार्यालय अंतर्गत दोन मध्यम, तीन लघू पाझर तलाव व २७ साठवण तलाव आहेत, १० साठवण तलाव व एक ल.पा तलाव शंभर टक्के भरले आहेत . आणखीन ४ तलाव भरण्याच्या मार्गावर आहे.तर ३५ दलघमी क्षमता असलेल्या कुरनूर मध्यम (बोरी धरण) प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहे.
लघू प्रकल्पातील पाणीसाठा टक्केवारीमध्ये पुढील प्रमाणे, चिवरी (उमरगा) ल.पा २० टक्के, चिवरी (उमरगा) क्र.१ - १२ %, चिवरी क्र.२ - २० % फूलवाडी- ६ %, देवसिंगा (तुळ ) १०० %, वाणेगाव १००%, वडगाव (देव ) १०० %, सलगरा (दिवटी) १००%, किलज- ९४ %, निलेगाव १५ %, येडोळा- ८८ %, आलीयाबाद - १०० %, जळकोट - १०० %, अणदुर ७३ %, मुर्टा क्र.१- १००%, मुर्टा क्र.२- १००%, होर्टी क्र.१ ४३ % , होर्टी क्र.२-१००%, होर्टी ल.पा १००%, हंगरगा (नळ) ल. पा- ३८ %, हंगारगा (नळ) सा.त -३९% नंदगाव-६ %, सिंदगाव- ५ , सलगरा ( मड्डी) - २ % कुन्सावळी- ४%, लोहगाव - ४१%, शहापूर - ४४ %, खुदावाडी - १०० %, केशेगाव - ११ % , चिकुद्रा २६ टक्के असे उपयुक्त पाणीसाठा आहे.
पूर्ण क्षमतेने भरलेले तलाव- वाणेगाव, सलगरा (दिवटी), मुर्टा १. मुर्टा २, होर्टी क्र.२, खुदावाडी व होर्टी क्र.२ (ल. पा) आलियाबाद, जळकोट, देवसिगा तुळ,वाणेगाव, वडगाव देव ,सलगरा दिवटी व बोरी धरण भरले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक हे धरणाच्या भुमीपूजनासाठी आले होते.
सन १९६० ते १९६८ दरम्यान बनवलेल्या कुरनूर मध्यम प्रकल्प बांधण्यासाठी एक कोटी ६८ लाख ६४ हजार रूपये खर्च आला होता. सन २००४-५ ते सन २०२३-२४ या मागील वीस वर्षात दहा वेळा कुरनूर मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरला आहे. सन २०१५-१६ मध्ये सर्वात कमी ३.७२ % पाणीसाठा होता.
श्री धिमाजी घुगे, भाजप शहराध्यक्ष नळदुर्ग
तब्बल दोन वर्षांनी बोरी धरण ओसंडून वाहत आहे.त्यामुळे बागायती क्षेत्रात वाढ उत्पादन चांगले होणार म्हणून शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या आहेत . मुबलक पाणी साठा झाल्याने बळी राजा सुखावला आहे.