भारतीय नौदलात निवड झालेली जिल्ह्यातील पहिली अग्निवीर क्रांती तानले हिचा आमदार पाटील यांच्या हस्ते गौरव ; पोलिस दल, राज्य राखिव दल, अभियंतापदी निवड झालेल्या युवकांचाही सत्कार
धाराशिव,दि.०८
जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते, तिथे वादळं सुद्धा पराभूत होतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना आत्मविश्वास कमी होऊ देऊ नये, असे प्रतिपादन धाराशिव कळब मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील यांनी केले.
प्रशासकीय, संरक्षण सेवेत निवड झालेल्या युवक, युवतीच्या धाराशिव तालुक्यातील बेंबळी येथील सत्कार समारंभात आमदार पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आबासाहेब गावडे, अनिल गिरवलकर, मोहनआप्पा महाराज वाघूलकर, सत्तार शेख, सोसायटीच अध्यक्ष प्रसाद इंगळे, डॉ. अमोल गावडे उपस्थित होते.
बेंबळी येथील क्रांती नवनाथ तानले आयएनएस अर्थात भारतीय नौदलात निवड झालेली जिल्ह्यातील पहिली अग्निवीर ठरली आहे. तीने यासाठी अवघड प्रशिक्षणही (ट्रेनिंग) पार पाडले आहे. यामुळे तीचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच राज्य राखीवर दलात निवड झाल्याने गणेश रावसाहेब सोनटक्के, नागपूर पोलिस दलात निवडीबद्दल प्रणित रामदास कोकाटे, सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंतापदी निवडीबद्दल ओंकार नागेश गाजरे, धाराशिव पोलिस दलात निवडीबद्दल बाबासाहेब महादेव गुरव, लातूर महानगरपालिकेत अभियंता पदावर निवडीबद्दल विश्वजीत शशीधर होळकर, एनएमएमएसच्या शिष्यवृत्ती मिळवल्याबद्दल कार्तिकी तानाजी तानले हिचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुण्यश्लोक फाउंडेशनचे अध्यक्ष धनंजय तानले, सूत्रसंचालन उपेंद्र कटके यांनी केले. आभार लक्ष्मण तानले यांनी मानले. यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब माने, माजी सरपंच बाळासाहेब कणसे, मोईन खान, दिनेश हेड्डा, प्रकाश बालकुंदे, भाजपचे नेते पांडूरंग पवार, राजाभाऊ नळेगावकर, शिवसेना शहरप्रमुख शाम पाटील, अनिल दाणे, नाना पाटील, अतिक सय्यद गावातील महिला, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटी सदस्य, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते