नळदुर्ग, दि. ०९
जकणी तांड्याच्या (नळदुर्ग ) विकास आराखड्यासोबत स्वतंत्र महसुल व ग्रामपंचायतसाठी प्रयत्न करुन सर्वानुमते समिती गठित करुन विकासाठी सर्वानी एक दिलाने काम करण्याची ग्वाही नुतन सदस्य विलास राठोड, संतोष चव्हाण यानी दिली.
याप्रसंगी विनायक राठोड, श्रीमंत राठोड, श्रीमंत राठोड, शिवाजी जाधव, राजू जाधव, रामसिंग राठोड, देविदास राठोड, नंदकुमार राठोड, देविदास नाईक, धोंडीराम जाधव , उद्धव राठोड, नामदेव जाधव, वसंत जाधव, विलास राठोड , विजय जाधव, रमेश जाधव, बाळू जाधव आदीजण उपस्थित होते.
उमरगा येथे भाजपच्या वतीने सत्कार
उमरगा येथील शासकीय विश्रामगृहात भाजपचे जिल्हाध्यक्ष संताजी काका चालुक्य यांनी संत सेवालाल महाराज बंजारा लमाण /तांडा समृध्दी योजने विषयी आढावा बैठक घेऊन मार्गदर्शन केले.यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष माधव पवार, संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृध्दी योजनेचे सदस्य संतोष चव्हाण, राणीताई राठोड, विद्यानंद राठोड, प्रविण पवार, दामाजी राठोड,पिन्टू राठोड आदी उपस्थित होते .