वाढत्या सुख-सोयींच्या लालसेने माणसाची शांती हिरावली
(जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष – १० ऑक्टोबर २०२४)
आजच्या आधुनिक जीवनशैलीत झपाट्याने उदयास येणारा एक दोष म्हणजे मानसिक ताण, जो आपण नेहमी लोकांच्या वागणुकीतून अनुभवतो, विविध परिस्थितींमध्ये आपल्याला देखील अनेक वेळा तणाव जाणवतो. दुःखामुळे, त्रासामुळे आणि लोकांच्या चुकीच्या वागणुकीमुळे माणसाला नेहमी भीती, चिंता, नकारात्मक व वाईट विचार मनात स्थिरावतात. घडलेल्या वाईट घटनांच्या आठवणी आपल्याला नेहमीच हादरवून टाकतात. एका दिवसात दहा चांगल्या आणि एक वाईट गोष्टी घडल्या असतील तर त्या चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून फक्त एक वाईट गोष्ट आपल्याला त्रास देते. जेव्हाकी त्या एका वाईट गोष्टीचे आपल्या जीवनात विशेष महत्व देखील नसते, पण निरर्थक बाबींना महत्त्व देऊन माणूस मन आणि शरीराला त्रास देतो. आपल्या मनावर ताबा नसणे हे समस्येचे मूळ कारण आहे. ताणतणाव वाढवण्याने किंवा स्वतःला मानसिक त्रास दिल्याने समस्या कधीच सुटत नाहीत. आपल्या सकारात्मक विचारांनी आणि यशस्वी प्रयत्नांनी तणाव संपेल.
मनुष्य हा सर्व प्राण्यांमध्ये सर्वात बुद्धिमान मानला जातो, विज्ञानाच्या क्षेत्रात मानवाने खूप प्रगती केली आहे. आजच्या आधुनिक वातावरणात, जिथे अनेक सुखसोयी आणि सुविधा पाहायला मिळतात, पण या आधुनिकतेत माणसाने आपला आनंद, शांतता, नैसर्गिकता, भोळेपणा, निरागसपणा गमावला आहे, त्याला मानसिक शांतता जाणवत नाही आहे. आपण भौतिक सुखाला सर्वस्व मानून माणुसकी विसरून पैशाच्या मागे वेडे झालो आहोत. माणसावरून माणुसकी हा शब्द बनला असून प्रत्येक माणसाने या शब्दाच्या अर्थानुसार आचरण करावें, परंतु उलट आजच्या काळात माणूस खूप खालच्या पातळीला गेला आहे की अनेक वेळा माणसांचा स्वार्थ पाहून असे वाटते की त्यांच्यापेक्षा पशु-पक्षी तरी बरे आहेत, जे स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्यांचा नाश करत नाहीत. आजची तरुण पिढी उशिरा रात्री जागते, घरात कमी आणि बाहेर जास्त खाते-पिते, लोकांचे सल्लेही त्यांना अपमानास्पद वाटतात, नियम हे निर्बंध समजतात. सोशल मीडिया आणि ऑनलाइन गेम्सने आपल्याला व्यसनाधीन बनवले आहे. फॅशन आणि आधुनिक जीवनशैली च्या नावाखाली आपण संस्कृती विसरत चालले आहोत. ज्यांना जबाबदाऱ्यांचे ओझे जाणवते ते कठोर परिश्रम करून आपले कर्तव्य पार पाडतात, त्यांना वयानेही फरक पडत नाही.
गुन्हेगारी, भ्रष्टाचार, पदाचा आणि सत्तेचा गैरवापर, प्रदूषण, भेसळ, सर्वत्र राजकीय हस्तक्षेप, अश्लीलता, खोटेपणा, देखावा, भेदभाव, फसवणूक, अंमली पदार्थांचे व्यसन, लोभ, असंस्कृत वर्तन, मत्सर अशा दूषित वातावरणात मानसिक शांतता मिळणे हा भ्रम आहे. लोकांच्या निष्काळजीपणामुळे देखील माणसाची डोकेदुखी होते, प्रत्येक क्षेत्रात सरकारी कर्मचाऱ्यांच्या कमतरतेच्या समस्येची शिक्षा सर्वसामान्यांना भोगावी लागत आहे. उदाहरणार्थ, वाहतूक पोलिसांच्या कमतरतेमुळे, वाहतूक नियमांचे खुलेआम उल्लंघन ही शहरांमध्ये मोठी समस्या आहे. प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक क्षेत्रात, प्रत्येक नातेसंबंधात आपल्याला काही लोक आढळतील जे फक्त इतरांना त्रास देण्यासाठी अस्तित्वात आहेत, कारण हे जगात अशांतता आणि अराजकतेचे वाहक आहेत, त्यांच्याशी संबंधित अनेकांना समस्येचा सामना करावा लागतो, परंतु हे एवढेच आपले जग नाही आहे. लोकांनी काय केले त्यापेक्षा आपण काय केले आहे? आपली काय बांधिलकी आहे, हे समजून घ्या. समृद्ध निसर्ग, सत्कर्म आणि समाधानी मन हेच जगातील मानसिक सुखाचा आधार बनू शकतात.
मानसिक ताण हा आपण स्वतः निर्माण केलेला दोष आहे, त्यामुळे समस्येवर उपाय शोधा, त्या बद्दल काळजी करू नका. बहुधा आपणच मानसिक तणावाचे निर्माते असतो. आपले वर्तनही याला कारणीभूत आहे, जसे की :- इतरांवर अतिविश्वास, वाईट सवयी, धीर पटकन गमावणे, स्वतःला कमकुवत आणि असहाय्य समजणे, आळशीपणा, आधुनिक दिनचर्येचे पालन करणे, नियमांचा अभाव, चुकीचा हट्टीपणा, मार्गदर्शनाचा अभाव, लोक काय म्हणतील याबद्दल घाबरणे, काहीतरी नवीन शिकण्याची भीती, अशा अनेक गोष्टी आपल्याला मानसिक आजारी बनवतात. जर आपण सत्याच्या मार्गावर चालत असू तर लाजेचा विचार कधीही करू नये. जीवन सोपे करून आनंदाने जगा.
नकारात्मक विचारसरणी असलेल्या लोकांपासून दूर राहणे आपल्यासाठी जीवनात खूप महत्वाचे आहे. जीवनात अशा लोकांचा आपण आदर केला पाहिजे जे आपल्या सुख-दु:खात आपल्याला नेहमीच साथ देतात, आपल्याला चांगले मार्गदर्शन करतात आणि परिस्थितीनुसार ते वागणूक बदलत नाहीत. प्रत्येक व्यक्तीची स्वतःची अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य आहे, आपण कधीही आपली मर्यादा विसरू नये आणि अशा प्रकारे वागू नये की आपल्या वागणुकीमुळे लोकांच्या स्वातंत्र्याला हानी पोहोचेल. आनंदी आणि शांत जीवन जगायचे असेल तर वाईट कामांपासून दूर, परोपकाराची भावना, निसर्गावर प्रेम, प्राण्यांची सेवा, असहाय्य लोकांना मदत केली पाहिजे आणि मानवतेच्या मार्गावर चालले पाहिजे, तरच आपण आनंदी राहू. कोणत्याही अपेक्षा आणि स्वार्थाशिवाय केलेली चांगली कृती आपल्याला जीवनात समाधान देते. स्वतःला नेहमी चांगल्या कामात व्यस्त ठेवा, आपल्या क्षेत्रात काम करताना नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करावा. थोडा वेळ काढून समाजासाठी योगदान द्या. निरोगी छंद जोपासा, नियमित व्यायाम करा, मैदानी खेळ खेळा, तुमचे वाढते वय फक्त एक संख्या म्हणून विचारात घ्या. आयुष्यात सुख-दु:ख, विजय-पराजय हे सतत चालू असतात, काळ कधीच सारखा राहत नाही, काळाप्रमाणे बदल होतात. कठीण प्रसंगी धैर्य राखा आणि जर आपण आपल्या आयुष्यात चांगले काम केले आणि चांगले वागलो तर चांगले लोकही आपल्याशी जोडले जातील. आपण आयुष्यात जे पेरतो, तेच फळ आपल्याला मिळेल.
आपल्याला आठवते का की आपण शेवटच्या वेळी केव्हा मनापासून दिलखुलास हसलोय? जेव्हाकी प्रत्येक क्षण हसत जगला पाहिजे. आयुष्यात समस्या येतील, पण त्या समस्येकडे आपण कसे पाहतो हे आपल्यावर अवलंबून आहे. समस्यांना आव्हान समजून जे सामोरे जातात ते नेहमीच यशस्वी होतात, कारण ते समस्यांना घाबरत नाहीत तर त्यांना संधी मानतात आणि पुढे जातात. कोणतीही समस्या किंवा दु:ख असेल तर त्या समस्येला आपल्यावर हावी होऊ देऊ नका, अजिबात तणाव घेऊ नका, कारण तणाव हे अनेक जीवघेण्या गंभीर आजारांचे मूळ आहे जे आपल्याला अधिक कठीण परिस्थितीत टाकते आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढण्यासही मदत होते. स्वतःवर विश्वास ठेवा, वेळेनुसार नेहमी अपडेट राहा, अडचणी आल्यावर निराश होण्याऐवजी उपाय काय असू शकतात यावर लक्ष केंद्रित करा. आपल्या फावल्या वेळेचा सदुपयोग करा, सकारात्मक विचार असलेल्या लोकांना भेटावे, राग, उत्कटतेने किंवा भावनेतून त्वरित निर्णय घेऊ नका. व्यसन आणि वाईट संगतीपासून दूर राहा. संस्कारांची सर्रास होळी जाळली जाते. पालकांनो, कृपया मुलांचे अतिलाड करून बिघडवू नका, त्यांना चांगले संस्कार द्या. कोणत्याही स्वार्थाशिवाय निराधारांना मदत केल्याने मनाला अनमोल दिलासा मिळतो. ज्या माणसाच्या मनात लोकांबद्दल कोणताही मत्सर किंवा भेदभाव नसतो आणि आपल्या कामात समाधानी असतो, तोच माणूस मानसिक तणावापासून दूर राहू शकतो.
डॉ. प्रितम भि. गेडाम
prit00786@gmail.com