नळदुर्ग येथे श्री ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताह सोहळा शुक्रवार रोजीपासून सुरु
नळदुर्ग,दि.१७: नवल नाईक
सप्ताह कालावधीत प्रवचन, कीर्तन, हरिजागर व महिला भजनी मंडळाच्या भजनासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री ज्ञानेश्वरी पारायण कालावधीत दररोज पहाटे ४ ते ६ काकडा आरती ,सकाळी ६ ते ७ माऊलीची पूजा, ७ ते ९ ज्ञानेश्वरी वाचन, दुपारी बारा ते चार गाथा भजन व महिला भजन, त्यानंतर साडेचार ते साडेपाच पर्यंत प्रवचन, नामजप, सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ , त्यानंतर रात्री ९ ते ११ हरिकीर्तन ,१२ ते पहाटे ४ हरीजागर असे दैनंदिन कार्यक्रम होणार आहे.
दि.१८ ते२४ यादरम्यान श्री ह भ प बलि बागल महाराज चिकुंद्रा, ह भ प संजय पवार महाराज शहापूर, तात्या महाराज सलगरा, मोहन पाटील किलज, कृष्णात जाधव, राजू पाटील वागदरी यांचे प्रवचन तर ह भ प महेश महाराज माकणी, विश्वनाथ गर्जे महाराज, प्रल्हाद सरडे महाराज नांदुरी, लक्ष्मण महाराज सोलापूर, राम महाराज गायकवाड चिकुंद्रा, गुरुवर्य ऋषिकेश महाराज वासकर यांचे कीर्तन होणार आहे. त्याचबरोबर गुरुवार दि. २४ रोजी गुरुवर्य श्री अप्पासाहेब महाराज दिंडेगावकर यांच्या हस्ते कालावाटप तर श्रीहरी ढेरे महाराज यांचे काल्याचे किर्तन होईल. यावेळी शिवाजी व-हाडे गुरुजी यांच्यावतीने महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.तसेच बुधवारी सायंकाळी पाच वाजता दिपोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तरी नळदुर्ग शहर व परिसरातील भाविक भक्तांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन माऊली महिला भजनी मंडळ ,श्री विठ्ठल रुक्माई मंदिर व्यवस्थापक मंडळ, जय हिंद तरुण गणेश मंडळ( व्यासनगर) व पारायण समिती नळदुर्ग यांच्यावतीने आवाहन करण्यात आले आहे