कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रदर्शनात रसिकांनी घेतला कविता व गीतांचा आनंद.....                       

 मुरूम, ता. उमरगा, ता. १७ : 

येथील बसव सहकार भवनमध्ये कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधून श्री महात्मा बसवेश्वर नागरी सहकारी पतसंस्था, महात्मा बसवेश्वर सार्वजनिक ग्रंथालय व रोटरी क्लब मुरूम सिटी यांच्या सयुक्त विद्यमाने बुधवारी (ता. १६) रोजी कोजागिरी काव्य मैफिलचे आयोजित करण्यात आले होते. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी प्राचार्य दत्तात्रय इंगळे होते. यावेळी पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे, रोटरीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, सचिव सुनील राठोड, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, डॉ. सुवर्णा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

विविध घटना, प्रसंग, वास्तव जीवनावर आधारित यावेळी कविवर्य सहशिक्षक रुपचंद ख्याडे यांनी संवेदना.....
" कसे सांगावे दुःख सारे, कशा व्यक्त करू वेदना, माणसासाठी माणसाला, उरल्या नाही संवेदना " ,
सहशिक्षक नागनाथ बदोले यांनी " वंदन माह्या माय मराठीला, अभिमान माझ्या या मराठी मातीला...", शिवशरण वरनाळे यांनी दगडाचा देव मानवा तू शोधलास दगडात देव..., कलाप्पा पाटील यांनी सोयासिस चातक मी उडत आलो तुझ्या किनाऱ्या काठी जल पिण्या गुलाबी ओठी..., विजयकुमार देशमाने यांनी विझवून आज रात्री कृत्रिम दीप सारे, गगनात हसणारा तो चंद्रमा पहा रे..., मारोती बोडरे यांनी " माय माझी शेतात राबत जाई अजूनही नाही सुटल तिच्या पाठीच खुरप ग बाई ", तत्रस्नेही सहशिक्षक सुनील राठोड यांनी ऋतू मागून ऋत नवे, दिसामागून दिस नवे..., हुसेन नुरसे यांनी महंमद रफी यांचे गीत, पत्रकार अजिंक्य मुरुमकर यांनी हॅपी पिरियड्स डे...., उपप्राचार्य कलय्या स्वामी, प्रकाश रोडगे, मोहन जाधव, गुंडेराव गुरव यांनी कविता सादर करुन श्रोत्यांची मने जिंकली. 

याप्रसंगी आनंद बिराजदार, सेवानिवृत्त मुख्याध्यापक काशिनाथ निर्मळे, प्रा. शिवाजी राठोड, प्रा. राजकुमार वाकडे, मल्लीनाथ बदोले, संचालक अशोक जाधव, अमृत वरनाळे आदिंची विशेष उपस्थिती होती. डॉ. सुवर्णा पाटील व  प्रा. डॉ. महेश मोटे यांनी मनोगत व्यक्त केले. दत्तात्रय इंगळे यांनी अध्यक्षीय समारोप करताना म्हणाले की, कविवर्यांनी सादर केलेल्या कवितेमागे एक विशिष्ट भावना, अनुभव व विचार असतो. कवितेतील शब्द, प्रतीकं आणि रूपकं यांचा वापर करून कवी त्या भावनांना व्यक्त करत असतो. शाखाधिकारी दत्तात्रय कांबळे, चिदानंद स्वामी, प्रशांत काशेट्टी, धीरज मुदकण्णा, सचिन कंटेकूरे, राजू मुदकण्णा, महांतय्या स्वामी, संतोष मुदकण्णा आदींनी पुढाकार घेतला. या काव्य मैफिलचे प्रास्ताविक संतोष कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन सहशिक्षक बालाजी भोसले तर आभार प्रा. डॉ. आप्पासाहेब सूर्यवंशी यांनी मानले.                                     

फोटो ओळ : मुरूम, ता. उमरगा येथील बसव भवनमध्ये काव्य मैफिलीत कविता सादर करताना कविवर्य कलप्पा पाटील व मान्यवर.
 
Top