पोलिसाचा आपघातात जीव गेल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांची बुजविण्याचे काम सुरु

नळदुर्ग,दि.१९ :

नळदुर्ग शहरातील महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे बुजवून दुरुस्तीचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या वतीने सुरू करण्यात आले. शनिवार रोजी सकाळी अंदाजे साडेनऊ  वाजण्याच्या दरम्यान अपघात होवुन  दुचाकीस्वार पोलिस कर्मचा-यांचा जागीच मृत्यू झाला.तर एक पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर  कांहीं तासांतच नळदुर्ग बसस्थानक ते आपलं घर प्रकल्प पर्यंत महामार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु करण्यात आले.

 महामार्गावरील खड्ड्यांमुळे गेला पोलीसाचा बळी, एक गंभीर 

 राष्ट्रीय महामार्गावरील नळदुर्ग  येथे शनिवार  दि.१९ ऑक्टोंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास नळदुर्गकडे येणाऱ्या कंटेनरने दुचाकीला पाठीमगून धडक दिल्याने दुचाकीवरील एक पोलीस कर्मचारी ठार तर एक  पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झाला. अपघातग्रस्त पोलीस कर्मचारी हे उमरगा पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे समजते. अपघातग्रस्ताना सदगुरू स्वामी नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेतून सुनिल भोळे यांनी मदत केले. जखमी पोलीस कर्मचाऱ्यावर नळदुर्ग उपजिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार करून सोलापूर शासकीय रूग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले.

नळदुर्ग जवळील राष्ट्रीय महामार्गावरील जूना जकात नाका येथे खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात हा अपघात झाल्याची चर्चा आहे. राष्ट्रीय महामार्गावर सर्वत्र खड्डेच, खड्डे पडाले आहेत.  मोटार सायकल क्रमांक एम.एच.२५ ए. १७१२ या दुचाकीवरील  मयत पोलीस कर्मचारी हिराचंद दिनकर मुळे (वय ३६,) व जखमी गहिनीनाथ विठ्ठल बिराजदार (वय ३८) यांच्या दुचाकीला सोलापूरच्या दिशेने चाललेला कंटेनर क्र.टी.एन ०१ बी एल ७९५२ या ट्रकने जोरदार धडक दिली. अपघाता नंतर रस्त्याच्या दुतर्फा एक  किलोमीटर पेक्षा अधिक वाहनाच्या रांगा लागून वाहतुक कोंडी झाली. महामार्गावर असंख्य ठिकाणी खड्डे पडल्यामुळे अपघात झाल्याचा आरोप करत लहुजी शक्तीसेनेचे शिवाजी गायकवाड यांनी महामार्गावर ठिय्या आंदोलन करुन प्रशासनाचा निषेध केला.

दरम्यान यापुर्वी महामार्ग पोलिस केंद्राने रस्त्यावरील खड्डे बुजवून त्याची डागडुजी करण्याबाबात राष्ट्रीय महामार्गाच्या संबंधित अधिकाऱ्यांना अनेक वेळा पत्र व्यवहार केल्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश मुंढे यांनी सांगितले. मात्र या अपघातानंतर रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरु केल्याचे दिसून आले.
 
Top