तुळजापूर: कोजागिरी पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी लक्षावधी भाविकाच्या गर्दीने सर्व स्स्ते गेले फुलून
भाविकांना बालाजी अमाईन्सच्या वतीने महाप्रसाद,तर तुळजापूरात श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने केशरयुक्त दुधाचे वाटप
तुळजापूर,दि.१७:उमाजी गायकवाड
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या अश्विन पोर्णिमा सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह परप्रांतातून लाखोच्या संख्येने तिर्थक्षेञ तुळजापूरात अनवाणी पायी चालत दाखल झाले. बुधवारी सोलापूर आणि नळदुर्ग रस्ते भक्तांच्या अलोट गर्दीने फुलून गेले. त्यामुळे अश्विन पौर्णिमेला सर्वत्र वातावरण मंगलमय झाल्याचे दिसुन आले.
नवरात्र महोत्सव किंवा अश्विन पौर्णिमा कालावधीत किमान एकाने तरी तुळजाभवानी मातेचे पायी चालत वारी करायचे असा संकल्प अथवा नवस विशेष करून धाराशिव,लातूर, बीड,सोलापूर,बार्शी,अहमदनगरसह कर्नाटकातील गुलबर्गा, विजापूर जिल्ह्यातील भाविक भक्ताकडून केला जातो.त्यामुळे ते पायी तुळजापूरला येतात.
अलीकडच्या काळात हैदराबाद ,सिकंदराबाद, संगारेड्डी,बसव कल्याण, हुमनाबाद येथूनही चालत मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांमध्ये लक्षणीय वाढ झालेली दिसून येत आहे.
कोजागिरी पोर्णिमा बुधवारी असली तरी देवीचे अश्विन पोर्णिमा विधी गुरुवारी संपन्न होणार असल्याने
यंदाचा अश्विन पोर्णिमा सोहळ्यास विक्रमी संख्येने भाविक आले आहे. श्रीतुळजाभवानी मातेची पाच दिवसाची गुरुवारी दि.17 रोजी पहाटे श्रीतुळजाभवानी मुर्ती सिंहासनावर विराजमान करण्यात आल्यानंतर श्री तुळजाभवानी मातेस पहाटे भविकांचे दही ,दुध,पंचामृत अभिषेकानंतर नित्योपचार पुजा करण्यात आली.नंतर सकाळी सहा वाजता पुनश्च भाविकांचे दहीदुधष अभिषेक करण्यात आले.रात्री सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या दोन काठ्या व पालख्यांचे घाटशिळ मार्ग 17 ऑक्टोंबर रोजी तुळजापुरात आगमन होणार आहे.
ठिकठिकाणी अन्नदान वाटप; बालाजी अमाईन्सच्या वतीने अन्नदान तर श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने केशर युक्त 350 लिटर दुधाचे वाटप
सोलापूरहून तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांसाठी बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक एन. राजेश्वर रेड्डी व कार्यकारी संचालक डि.राम रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी येथील बालाजी अमाईन्स कंपनी समोर भाविकांना अन्नदान वाटप करण्यात आले.
नळदुर्ग रोडवर श्रीनाथ मंगल कार्यालयाच्या वतीने साडेतीनशे लिटर दुधाचे वाटप
नळदुर्गहुन तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी येणाऱ्या भाविकांसाठी श्रीनाथ मंगल कार्यालयाचे सर्वेसर्वा गणेश पुजारी व महेश पुजारी यांच्या वतीने 350 लिटर केशर युक्त मसाला दुधाचे वाटप करण्यात आले. तसेच भाविकांसाठी सोलापूर व नळदुर्ग रोडवर ठिकठिकाणी अन्नदान, नाष्टा,चहा पाण्याची सोय करण्यात आली होती.
संतोष दादा मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव-सुरतगाव रस्त्यावर अन्नदान
उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा मार्ग तुळजापूरकडे येणाऱ्या भाविकांसाठी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष (दादा)बोबडे मित्र परिवाराच्या वतीने सावरगाव -सुरतगाव रोडवर यशवंत स्टोन क्रशर केंद्रा समोर विविध मान्यवरांच्या उपस्थितीत अन्नदान वाटप करण्यात आले.
प्रारंभी भाजपचे तालुकाध्यक्ष संतोष बोबडे यांच्या हस्ते आई तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पूजन करुन अन्नदान कार्यक्रमास प्रारंभ करण्यात आला. यावेळी संतोष बोबडे मित्र परिवारातील सदस्य उपस्थित होते.
सोलापूर अक्कलकोट मार्ग कर्नाटकातील भाविक पायी चालत भाविक तुळजापूरकडे मार्गक्रमण करीत आहेत.
त्यामुळे बुधवारपासून तिर्थक्षेञ तुळजापूरात भाविकांची मोठी गर्दी होत आहे. सध्या बीड, लातूर, उमरगा, बार्शी अहमदनगर तसेच सोलापूर येथून तुळजापूरकडे येणाऱ्या सर्व मार्गावर भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे दिसत आहेत. यामध्ये तरुणाई मोठ्या संख्येने येत आहेत. त्यामुळे तुळजापूरकडे येणारे सर्व रस्ते हे भक्तांच्या गर्दीने फुलून गेले असून बुधवारी लाखोच्या संख्येनी भाविकांनी हजेरी लावली आहे.
रात्री सोलापूर येथील शिवलाड तेली समाजाच्या मानाच्या दोन काठ्या छबिना अग्रभागी घेवुन वर्षातील मानाचा छबिना काढण्यात येणार आहे त्यानंतर महंत तुकोजीबुवा यांनी प्रक्षाळ,पुजा केल्यानंतर जोगवा कार्यक्रम होवुन अश्विनी पोर्णिमा धार्मिक विधीचा सांगता होणार आहे.