१६४ उमेदवारांचे २२३ नामनिर्देशनपत्र वैध तर ४८ नामनिर्देशन अवैध १८५ उमेदवारांनी दाखल केले होते २७१ नामनिर्देशनपत्र
धाराशिव दि.३० (माध्यम कक्ष)
विधानसभा सार्वत्रिक निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नामनिर्देशन पत्राची छाननी प्रक्रिया आज ३० ऑक्टोबर रोजी पार पडली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा २९ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस होता.या शेवटच्या दिवसापर्यंत जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशनपत्र दाखल केले.यापैकी चार विधानसभा मतदारसंघातून १६४ उमेदवारांचे २२३ नामनिर्देशनपत्र वैध तर ४८ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. दि.३० ऑक्टोबर रोजी नामनिर्देशनपत्र दाखल केलेल्या उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रांची छननी करण्यात आली.
२४० - उमरगा विधानसभा मतदारसंघातून एकूण प्राप्त ३२ उमेदवारांच्या ४३ नामनिर्देशनपत्रापैकी ३४ नामनिर्देशन पत्र वैध ठरले आहे.तर ९ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. प्राप्त नामनिर्देशनपत्रामध्ये २८ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे. ४ नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहे.
शेवटच्या दिवशी २९ ऑक्टोबरपर्यंत जिल्ह्यातील चार विधानसभा मतदारसंघातून १८५ उमेदवारांनी २७१ नामनिर्देशनपत्र दाखल केले. यामध्ये उमरगा विधानसभा मतदारसंघातून ३२ उमेदवारांनी ४३, तुळजापूर विधानसभा मतदारसंघातून ५४ उमेदवारांनी ८७, उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून ५० उमेदवारांनी ७१ आणि परंडा विधानसभा मतदारसंघातून ४९ उमेदवारांनी ७० नामनिर्देशनपत्र दाखल केले.
२४१ - तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ५४ उमेदवारांनी ८७ नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत. यापैकी ७७ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहे. तर १० नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहे.वैधरित्या नामनिर्देशित झालेल्या उमेदवारांची संख्या ५१ इतकी आहे तर ३ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.
२४२ - उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघात ५० उमेदवारांनी ७१ उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ५५ नामनिर्देशनपत्र वैध ठरले आहेत.तर १६ उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत.वैधरित्या नामनिर्देशित झालेले ४३ उमेदवार असून ७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.
२४३ - परंडा विधानसभा मतदार संघात ४९ उमेदवरांनी ७० नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आले होते.त्यापैकी ५७ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत.तर १३ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले आहेत. यातील ४२ उमेदवार हे वैधरित्या नामनिर्देशित झाले आहेत तर ७ उमेदवारांचे नामनिर्देशनपत्र फेटाळण्यात आले आहेत.
आज ३० ऑक्टोबर रोजी दाखल केलेल्या नामनिर्देशन पत्राची छाननी दुपारी पार पडली.छाननी प्रक्रियेनंतर ४ नोव्हेंबरपर्यंत उमेदवारांना नामनिर्देशनपत्र मागे घेता येणार आहेत.२० ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील १ हजार ५२३ मतदान केंद्रावर प्रत्यक्ष मतदान होणार आहे.