विधानसभेसाठी मोर्चे बांधणी करण्याचे राज ठाकरें यांचें आदेश
तुळजापूर,दि.०६
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी दि-5 ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाड्यातील सर्वच विधानसभा क्षेत्रातील प्रमुख पदाधिका-यांची बैठक आयोजित केली होती,यामध्ये इच्छुक उमेदवाराची चाचपणी केली व माहिती घेतली,तसेच पक्ष संघटना बांधणी,कार्यक्रम,मेळावे याबाबत पदाधिका-यांना मार्गदर्शन केले,तुळजापूर विधानसभा मतदार संघातील पक्षाची सद्य परिस्थितीची माहिती घेतली,मनसे नेते अमित ठाकरे,अविनाश अभ्यकंर,पक्ष निरीक्षक नयन कदम,प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे यांनी संघटना बांधणी,व येत्या काही दिवसात तालुक्यातील रिक्त पदे, उर्वरित विभाग अध्यक्ष,शाखाध्यक्ष,गटाध्यक्ष यांच्या नियुक्त्या करून मेळावे घेण्याचे आदेश दिले आहेत.
यावेळी जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव,अविनाश साळुंखे,तालुकाध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,नळदुर्ग शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णीसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.