शासन निर्णयानुसार कोटा निश्चित करूनच,नगरपालिकेने निविदा प्रक्रिया करावी-मनसे
नळदुर्ग ,दि.०८:
शासन निर्णयानुसार सुशिक्षित बेरोजगार अभियंता,मजूर संस्था व पात्र नोंदणीकृत कंत्राटदार यांचा 40:26:34 प्रमाणे कोटा निश्चित करूनच नगरपालिकेने निविदा प्रक्रिया पार पाडावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली असून दि 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्यदिनी या प्रमुख मागणी करीता लाक्षणिक उपोषणही केले होते,
त्यावेळी पालिकेने लेखी आश्वासन देऊन उपोषण सोडविले होते,आता परत मनसेने पालिकेला निवेदन दिले आहे कि,येत्या काही दिवसात पालिकेकडून 34 कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्यात येणार असून,त्या एकत्रितरित्या करण्यात येणार असल्यामुळे सुशिक्षित बेरोजगार अभियंता यांच्यावर अन्याय होऊन,परत विशिष्ट ठेकेदार डोळ्यासमोर ठेवून निविदा काढली जाईल अशी शक्यता व्यक्त केली असून,यापूर्वी लाडका गुत्तेदार योजना सुरु केल्याप्रमाणेच एक नव्हे दोन नव्हे सत्तावन्न कामे एकाच कंत्राटदारास देण्यात आल्याचे अरोप करत पालिकेने मनमानी धोरण राबवत,नागरिकांची विश्वसहर्ता गमावत मालकीहक्क गाजवत अधिकारी आपलेच धोरण पुढे करत असल्याचे सांगितले आहे.
शासन निर्णयानुसार निविदा प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अभियंता,मजूर संस्था,पात्र नोंदणीकृत कंत्राटदार यांचा 40:26:34 प्रमाणे कोटा निश्चित करूनच निविदा काढावी व वरिष्ठ स्तरावरुन याबाबत मागविलेले मार्गदर्शन जाहीररित्या प्रसिद्ध करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिलेल्या निवेदनात केली आहे,अन्यथा इतर कायदेशीर मार्गाने महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढा देईल असा इशारा ही निवेदनात दिला आहे. निवेदनावर मनसे कार्यकर्त्यांचे सह्या आहेत.