नळदुर्ग: भाविकांच्या कार व टमटम आपघातात 
एक ठार,१३भाविक जखमी

नळदुर्ग,दि.०९

नवरात्रोत्सवात श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेवून तुळजापूरहुन गावाकडे परतणा-या व चिवरीच्या महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी जात असलेल्या टमटम व कारचा समोरासमोर जोरदार धडक होऊन झालेल्या आपघातात एका महिला भाविकाचा जागीच मृत्यू झाला.तर १३ भाविक जखमी झाल्याची घटना नळदुर्ग येथे मंगळवारी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या दरम्यान घडली.

 नळदुर्ग ते तुळजापूर मार्गावर नळदुर्ग येथील जलशुद्धीकरण केंद्राजवळ टमटम व कारचा भिषण आपघात होवून ज्येष्ठ  महिलेचा मृत्यू झाला. तर दोन्ही वाहनातील मिळून १३ जण जखमी झाले. जेवळी (ता. लोहारा) येथील महिला चिवरी (ता. तुळजापूर) येथे दर्शनासाठी चाललेला टमटम क्र.एम.एच. २५ एम ६७६ व तुळजापूरकडून येणारी कार क्र.के.ए. ०३ एमआर ०४४१  यांच्यामध्ये मंगळवार दि.८ रोजी दुपारी १२.१५ वाजण्याच्या सुमारास समोरासमोर धडक बसली.

 सोजरबाई तिप्पन्नप्पा कोराळे, रा. जेवळी  (वय ७२ ) यांचा अपघातात मृत्यू झाला,  टमटम चालक रवी बाबुराव इगवे (वय २६ ) , गौराबाई सूर्यकांत साखरे ( वय६५ ) शामल विश्वनाथ हावळे ( वय ५०) सरिता मल्लिनाथ हावळे ( वय ४०) रागिनी अरुण हावळे ( वय ३२)  भागाबाई सदाशिव हावळे ( वय६०) सविता गुळवंत हावळे वय ४७) सिंधुबाई काशिनाथ गुंजोटे (वय ५०),  मंगल बाबुराव साखरे (वय ४५) सुधाबाई सोमनाथ माशाळे, सुमनबाई दत्तात्रय हावळे  सर्व रा. जेवळी ता. लोहारा, तसेच कारमधील  सरस्वती शामराव (वय ४६ ) व अंकिता विरशेट्टी आष्टे (रा.कामठाण.जि.बिदर कर्नाटक) अशी जखमीची नावे आहेत. कारमध्ये एकूण पाच प्रवासी होते. 

जखमी पैकी दोन गंभीर व इतर चार असे सहा जणांना सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले आहे, उर्वरीत सर्व जखमी रूग्णावर नळदुर्ग येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात घडल्यानंतर माजी जि.प.  सदस्य गणेश सोनटक्के, सुनिल भोळे  व इतर नागरिकांनी  अपघातग्रस्ताना त्वरीत मदत केली. स्वामी नरेंद्र महाराज यांच्या रूग्णवाहिकेतून सर्व जखमी भाविकांना दवाखान्यात पाठवण्यात आले.
 
Top